अर्धापूरचा अमोल सरोदे अर्थशास्त्र विषयात झाला ‘सेट’ परिक्षा उत्तीर्ण
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘सेट’ (SET) परिक्षेत अर्थशास्त्र (Economics) विषयात अर्धापूरचा अमोल उद्धवराव सरोदे याने उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले. भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड जिल्हा संघटक तथा पत्रकार उध्दव सरोदे यांनी जिवनात संघर्ष करुन विना नोकरीचे मुलामुलींना शिक्षण देऊन घडविले यात त्यांचा मोठा मुलगा ॲड. गौरव सरोदे बी.ए.,एल.एल.बी., एल.एल.एम. असुन न्यायालयात ॲडव्हकेट आहे, दुसरा मुलगा वैभव सरोदे बी.सी.ए., एम.सी.एस. असुन सीआयएसएफ जवान (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) जमादार आहे, तिसरी मुलगी सौ. रमा प्रविण जाधव डी.एड असुन महाराष्ट्र राज्य पोलीस कान्सटेबल आहे, सर्वात लहान अमोल सरोदे हा सेट परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व यु.जी.सी. नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित सहायक प्राध्यापक पदासाठी आयोजित राज्यस्तरीय पात्रता अर्थात ‘सेट’ (SET) परिक्षा दि. १५ जून रोजी पार पडली. तर निकाल दि. ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या परिक्षेत एकूण ९०३६६ उमेदवार परिक्षेस बसले होते त्यापैकी ६०५० उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर अर्धापूर जि. नांदेड येथील अमोल उद्धवराव सरोदे यांनी कुठलाही खाजगी क्लास न लावता स्वतः अभ्यास, मेहनत, जिद्द, चिकाटीने अभ्यास करून हे यश संपादन केले. आपल्या यशाचे श्रेय त्याने वडील उद्धवराव सरोदे, आई जयशिला सरोदे, गुरुजण वर्ग, बहिण भावंडे यांना दिले आहे.
अमोल सरोदे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्या शाळा अर्धापूर, माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर, बारावीचे यशवंत महाविद्यालय नांदेड येथून तर महाविद्यालयीन शिक्षण शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथून बी.ए. मध्ये पूर्ण केले. त्यांनी सामाजिक शास्त्रे संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून ‘अर्थशास्त्र’ विषयात एम.ए. पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.
अमोल सरोदेंच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. या यशाबद्दल श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, युवा उद्योजक नरेंद्र दादा चव्हाण, माजी प्राचार्य आर.जी.जाधव, माजी प्राचार्य के.के.पाटील, डॉ. घनश्याम येळणे, प्रा. विलास चव्हाण, प्रा.रघुनाथ शेटे, प्रा. साईनाथ शेटोड, प्रा. जे.सी.पठाण, प्रा. एम.के.काझी, प्रा.पुंडलिक भोसले, ग्रंथपाल राजीव वाघमारे, प्रा.अविनाश कदम, प्रा. प्रमोद लोणारकर, प्रा.भागवत पस्तापुरे, प्रा. बाबासाहेब भुक्तारे, प्रा. दिनेश पाटील,प्रा.विकास कदम,प्रा. प्रविण रावते,सुभाषदादा काटकांबळे, आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम,ॲड. मंगेश वाघमारे, शिक्षिका माया भद्रे, ॲड. किशोरजी देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष नांदेड,धर्मराज देशमुख प्रदेश कार्यकारिणी सदस्य, संजय देशमुख सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड,नगराध्यक्ष प्र. प्रविण देशमुख, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, नासेर खान पठाण, उपनगराध्यक्ष मुख्तेदरखान पठाण, माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे, मुसविर खतिब, संचालक निळकंठराव मदने, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,सुनिलराव वानखेडे काँग्रेस तालुकाध्यक्ष,जिल्हा उपाध्यक्ष नागोराव भांगे पाटील,शिवा संघटना जिल्हाध्यक्ष विलास कापसे, पंडितराव लंगडे,डाॅ.विशाल लंगडे, व्यंकटी राउत,सोनाजी सरोदे,नामदेव सरोदे,आर.आर.देशमुख,दत्ता पाटील पांगरीकर, जिल्हाध्यक्ष विलास साबळे, योगेश हळदे शहराध्यक्ष, शेख मकसुद सचिव काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश निवड समिती अध्यक्ष तथा संपादक दैनिक समीक्षा रुपेशजी पाडमुख, दै.दलितवाणीचे संपादक बालाजीराव पालीमकर,दिनेश पालीमकर,नांदेड जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, ओमप्रकाश पत्रे,सुभाष लोणे,आझाद समाज पार्टीचे प्रभाकरराव वाघमारे, जिल्हाध्यक्ष विनायकजी लोहकरे, गोविंद टेकाळे, फिरदोस हुसेनी, सखाराम क्षिरसागर,गुणवंत विरकर, शंकरराव ढगे,रामराव भालेराव,वली मोहम्मद खतीब,सिध्दार्थ लोखंडे, गंगाधर सोनटक्के,गंगाधर सुर्यवंशी, दै.नांदेड चौफेरचे संपादक आरेफ खान पठाण,दै.सत्य मराठीचे संपादक अय्युब पठाण, संपादक ॲड.रमेश माने,छगन इंगळे,आनंद सिनगारे,शेख शकील,शिवहार घोडेकर,मनोज आंबेगावकर,इरफान पठाण सर्व पत्रकार,प्रतिनिधी,संपादक,भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, सिध्दार्थ जोंधळे, बळीराम कांबळे, अनिल कांबळे,पोलिस प्रविण जाधव,विक्रांत कांबळे,भिमानंद लघुळकर,सुशांत सरोदे यांच्यासह इतर सर्वांनी अमोल सरोदेचे अभिनंदन करुन त्यांना पुढील यशस्वी कार्यास शुभेच्छा दिल्या.