न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

42

न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

ठाणे: कोपरी ठाणे येथील न्यू प्रगती शैक्षणिक संस्था आणि हॅपी बालवाडी तर्फे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक संचालिका अनिता दिनकर खरात यांच्या सौजन्याने करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष गणेश दिनकर खरात, उपाध्यक्ष सुनील कांबळे, खजिनदार चंद्रकांत सोनवणे, उपखजिनदार किरण धांडोरे, सहसचिव महेश गड अंकुश, सभासद महेश खरात, सुनिता सोनवणे, सारिका गड अंकुश तसेच वर्गशिक्षिका दीक्षा कांबळे, संजीवनी रोकडे व शितल घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलुंड येथील धांगडपाडा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शिक्षकांचे समाजातील योगदान, विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व आणि शिक्षणाचे स्थान यावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनीही विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून “शिक्षक हेच खरे मार्गदर्शक” या विचाराची जाणीव करून दिली. शिक्षण हे प्रत्येकाच्या आयुष्यातील मौल्यवान भांडवल असून शिक्षक हा पालक आणि विद्यार्थी यांच्यातील आपुलकीचा दुवा आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.