अंगणवाडी सेविकांचे नेते कॉम्रेड ए.एम.पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

24

अंगणवाडी सेविकांचे नेते कॉम्रेड ए.एम.पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे अध्यक्ष कॉम्रेड ए.एम.पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील लाखो अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका तसेच असंख्य कामगार, सहकारी व हितचिंतक यांच्यावर शोककळा पसरली आहे. ए.एम.पाटील यांनी प्रसिद्ध कामगार नेते, सर्व श्रमिक संघ, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, बांधकाम कर्मचारी संघ आणि अशा अनेक युनियनचे प्रणेते, अध्यक्ष म्हणून संघटनांची पदे भूषविली आहेत. तसेच त्यांनी कित्येक दशके अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत त्यांचे प्रश्न शासनाच्या दरबारी मांडून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी झगडले आहेत. त्यासाठी आक्रमक पवित्रा घेत लाखो अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सोबत घेत संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर दिल्ली पर्यंत त्यांनी कित्येक मोर्चे, उपोषण, चळवळी, पदयात्रा करीत न्याय मिळवून देण्यासाठी अध्यक्ष या नात्याने महत्वाची भूमिका बजावली आहे. असा नेता पुन्हा होणे नाही. प्रचंड हुशार आणि अभ्यासू वृत्तीमुळे मंत्रालयातील पदाधिकारी हे देखील त्यांचा आदर करीत होते. अंगणवाडी सेविकांना ५० रुपये मानधनावावरून आज १५०००/- मानधनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सेविकांना न्याय मिळवून दिला आहे. अशा नेत्याच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली असून ज्याचा एक शब्द आज्ञा समान मानणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी ही बाब अतिशय दुःखदायक व धक्कादायक असल्याचे मत यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे यांच्या रायगड जिल्हा प्रतिनिधी जिविता पाटील यांनी व्यक्त करीत आमचा नेता, कैवारी, अन्नदाता मायबाप असणारा आधारवड हरपला या शब्दात आपले दुःख व्यक्त केले आहे.

कॉम्रेड ए.एम.पाटील यांच्या जाण्याने अंगणवाडी सेविकांचे प्रश्न परखडपणे शासनाच्या निदर्शनास आणून देणारा अंगणवाडी सेविकांचा नेता, कैवारी, अन्नदाता मायबाप असणारा आधारवड हरपला आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, कामगार आणि महाराष्ट्रातील त्यांचे असंख्य हितचिंतक यांच्यासाठी ही अतिशय दुःखदायक व धक्कादायक बाब असून ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
जीविता पाटील.
महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे, रायगड प्रतिनिधी.