छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तर अभियानांतर्गत “सेवा पंधरवडा” — शिरगाव मंडळात शिवार फेरी यशस्वीपणे संपन्न

23

छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तर अभियानांतर्गत “सेवा पंधरवडा” — शिरगाव मंडळात शिवार फेरी यशस्वीपणे संपन्न

सिध्देश पवार
तालुका प्रतिनिधी
8482851532

रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या “सेवा पंधरवडा” उपक्रमात शिरगाव मंडळात शिवार फेरी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या फेरीचा उद्देश म्हणजे नकाशावर असलेले तसेच नकाशावर नोंद नसलेले शिवकालीन, पाणंद व पारंपरिक रस्ते यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या अचूक नोंदी करणे हा होता.
या कार्यक्रमात शिरगाव, वडवली, वलंग, कुर्ले आणि साव या तलाठी सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्रत्यक्ष फेरी करत ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संवाद साधून रस्त्यांची पाहणी करण्यात आली. गावात अस्तित्वात असलेले पण महसूल नकाशावर नोंद नसलेले रस्ते ओळखून, त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी ग्रामसभा ठराव घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
हा उपक्रम माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार राबवण्यात आला असून, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली खालील अधिकारी उपस्थित होते:
मंडळ अधिकारी शिरगाव: सौ. जे. डी. फुलावर / चौगुले
ग्राम महसूल अधिकारी, सजा शिरगाव: सौ. एस. एन. मोरे
ग्राम महसूल अधिकारी, सजा कुर्ले: श्री. एस. एम. पवार
ग्राम महसूल अधिकारी, सजा वडवली: श्री. चेतन जागडे
ग्राम महसूल अधिकारी, सजा वलंग: श्री. सुधीर वायदंडे
ग्राम महसूल अधिकारी, सजा साव: सौ. माधुरी बागडे
यावेळी ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, रस्त्यांच्या नोंदीकरणाची ही प्रक्रिया गावाच्या भविष्यातील विकासात मोलाची ठरणार आहे.