Home latest News जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची सुरुवात,
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची सुरुवात,
मा. खासदार धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती.
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात आलेले आहे. सदर राष्ट्रीय कार्यक्रमाचे उदघाटन हे मध्यप्रदेशातील धार जिल्हा येथून करण्यात आले व त्यांचे थेट प्रक्षेपण एकाच वेळी ऑनलाइन व्हीसीद्वारे देशभरात करण्यात आले. ऑनलाइन व्हीसीद्वारे उदघाटन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाकरिता खासदार धैर्यशील पाटील हे उपस्थित होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व मा. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस, मा. उपमुख्यामंत्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री अजितजी पवार, मा. आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य प्रकाश अबिटकर व मा.राज्य आरोग्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हाधिकारी मा. किशन जावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या नियोजनानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे उदघाटन कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी सत्यजित बडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, प्रियदर्शनी मोरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अधिकारी, चित्रलेखा पाटील, अँड.महेश मोहिते,., डॉ. पूर्वा पाटील, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड, डॉ. मनीषा विखे – पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मा. खासदार धैर्यशील पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वस्थ नारी सशक्त परिवार या विशेष अभियानाची रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथून सुरुवात झाल्याचे सांगून महिला वर्गाला समानतेचा दर्जा देऊन महिलांचे आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे, तसेच महिलाचे सबलीकरण होणे गरजेचे असल्याचे सांगितले. पुरुष व स्त्री हे समसामान असून महिलांना सुद्धा समानतेचा मान मिळाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच स्वदेशी वस्तूंची खरेदी करण्याबाबत मोहीम राबविण्याबाबत सांगितले. तसेच दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाकरिता आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी याना सदरचे अभियान यशस्वीपणे राबविण्याकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी सदर शिबीरास महिलांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे सांगत सदर शिबीर यशस्वी झाल्याचे सांगितले. तर प्रास्ताविकामध्ये डॉ. शीतल जोशी, अति. जिल्हा शल्यचिकित्सक तथा अभियानाच्या नोडल अधिकारी यांनी या शिबिरामध्ये महिलांच्या तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोगाची प्राथमिक तपासणी, रक्तदाब व मधुमेह, रक्ताचे हिमोग्लोबिन, सिकलसेल तपासणी तसेच रक्तदान मोहीम, माता व बालकांचे संरक्षण कार्ड, माता व बालकाचे लसीकरण, क्षयरोग तपासणी, निक्षय मित्र बनविण्यासाठी मोहीम इतर सामान्य आरोग्य समस्यांसाठी समुपदेशन अशा तपासणीचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे सांगण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा ३२ ठिकाणी या विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रतिम सुतार यांनी केले. सदर शिबिरामध्ये जिल्ह्यातील एकूण २९१ महिला सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेतली. सदर कार्यक्रमाच्या वेळी आभा व आयुष्मान कार्ड नोंदणी, परिचारिका प्रशिक्षण केंद्राद्वारे पोषण आहार जनजागृती, रक्ततपासणी विभाग, आयुष विभाग, आर बी एस के विभाग, आयसीटीसी, एआरटी, डीएसआरसी विभाग, क्षयरोग विभाग, सिकलसेल, डीइआयसी, अवयव दान नोंदणी आदी विभागांतर्गत तपासणी करण्यात आली. या सोबतच ओपीडी विभागामध्ये शस्त्रक्रिया विभाग, स्त्रीरोग विभाग, कान नाक घसा विभाग, अस्ती विभाग, मानसिक आरोग्य विभाग इतर सर्व विभागामध्ये तपासणी व उपचार सुरु होते. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. किरण शिंदे, अधिसेविका गायत्री म्हात्रे, सारिका पाटील, प्राचार्या, नर्सिंग स्कूल. सहा. अधिसेविका अनिता भोपी यांच्या सहित सर्व विभागातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, पी.एच.एन. सार्वजनिक आरोग्य, परिचर्या विभाग, कर्मचारी व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी व कर्मचारी, डापकु विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षकांसहीत विद्यार्थी-विद्यार्थींनीनी परिश्रम घेतले.