Home latest News १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छोत्सव’ या संकल्पनेस अनुसरून राबविण्यास...
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छोत्सव’ या संकल्पनेस अनुसरून राबविण्यास सुरवात
✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098
नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेनद्वारा ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छोत्सव’ या संकल्पनेस अनुसरून राबविण्यात येत आहे.या अभियानाचा शुभारंभ बुधवारी (ता.१७) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.अभियानातील उपक्रमा अंतगर्त मनपा मुख्यालयातून ‘७२ तास स्वच्छता’ उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त श्री. राजेश भगत यांच्यासह स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.उपक्रमाअंतर्गत १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान मनपाच्या दहाही झोन मधील विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे.