छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियाना अंतर्गत वृक्षारोपण
म्हसळा: संतोष उध्दरकर.
म्हसळा: महामार्ग, राज्यमार्ग, विकासाच्या नावाखाली सर्रास पणे वृक्षाची कत्तल केली जात आहे, जंगल नष्ट होऊ लागले आहेत, त्यामुळे काही ठिकाणी निसर्गाचा प्रकोप पहायला मिळतो, म्हसळा तालुका सुजलाम, सुफलाम असून इथे मोठ्या प्रमाणात जंगल आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत तसेच पर्यावरण समतोल राखण्यासाठी एक पेड माँ के नाम अभियान राबवुन म्हसळा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कुल, पाभरा येथे वृक्षारोपण करण्यात आले, या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून कवी लेखक वनविभाग अधिकारी भिमराव सुर्यतळ यांनी पर्यावरण या विषयावर अतिशय सुंदर गित सादर करून उपस्थितांचे मने जिंकली, तसेच वनरक्षक टेटगुरे यांनी देखील उत्तम मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे नियोजन वनक्षेत्रपाल संजय पांढरकामे, सा.व. वन क्षेत्रपाल पी. एल. पाटील यांनी केले होते. या वेळी मुख्याध्यापक बक्कर, मंगेश कदम, वसावी, पाटील, वनविभाग अधिकारी भिमराव सुर्यतळ,वनक्षेत्रपाल संजय पांढरकामे, सामाजिक वनिकरण वन क्षेत्रपाल पी. एम. पाटील,वनपाल दत्तात्रय केवारी, वाघे मेजर , कराडे भाऊसाहेब, वनरक्षक टेटगुरे,गायकर, बुध्ये मॅडम, राठोड आदी मान्यवर, पालक, विद्यार्थी, शिक्षकवृंद उपस्थित होते.