‎भंतेजी विमासां यांना धक्काबुक्की विरोधात आंबेडकर विचार संवर्धन समितीकडून आंदोलनाचा इशारा

26

‎भंतेजी विमासां यांना धक्काबुक्की विरोधात आंबेडकर विचार संवर्धन समितीकडून आंदोलनाचा इशारा

‎रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निषेध मोर्चात सहभागी व्हावे, श्रावण मोरे यांचे आवाहन

‎मुंबई: मुंबई विद्यापीठ परिसरात 15 सप्टेंबर 2025 रोजी घडलेल्या गंभीर व अनुचित प्रकाराचा तीव्र निषेध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती*च्या आधिपत्याखाली शुक्रवार, दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता कालिना, मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

‎मिळालेल्या माहितीनुसार, आदरणीय भंतेजी विमासां हे केंद्रीय मंत्री श्री. किरण रिजुजू यांना शांतपणे निवेदन देण्यासाठी जात असताना, त्यांना रस्त्यामध्ये आडविण्यात आले. यावेळी त्यांच्या वर धक्काबुक्की करून त्यांचे चिवर फाडण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

‎या निषेध मोर्चामध्ये सांताक्रुज विभागातील सर्व सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संस्था तसेच विविध संघटनांचा सहभाग राहणार आहे. महिला व पुरुष बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

‎या मोर्चाचे आयोजन *डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती*तर्फे करण्यात आले असून अध्यक्ष विजय वाघमारे व सरचिटणीस संदीप साळवी यांनी संयुक्त आवाहन केले आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कालिना विधानसभा अध्यक्ष *माननीय श्रावण मोरे* यांनी दिली असून रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निषेध मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.