राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी म्हणजेच केंद्रस्थानी डॉ.निलेश राणे यांची पदोन्नती.

182

राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी म्हणजेच केंद्रस्थानी डॉ.निलेश राणे यांची पदोन्नती.

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो. ९८६००२००१६

नाशिक: डॉ.निलेश राणे यांची दिल्ली येथून राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण मंडळाकडून “राष्ट्रीय उपाध्यक्ष” पदी म्हणजेच केंद्रस्थानी पदोन्नती करण्यात आली आहे.

याआधी डॉ.निलेश राणे महाराष्ट्रामध्ये संघटन राज्यमंत्री म्हणून ३ वर्ष काम बघितले, त्यांच्या या कालावधी मध्ये अतिशय उत्तम कामगिरी केली, त्याबद्दल त्यांची राष्ट्रीय स्तरावर म्हणजेच केंद्रस्थानी वर्णी लागली आहे.

राज्य व स्थानिक पातळीवरील गुन्हेगारी व भ्रष्टाचार नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्थेस बळकटी देणारी राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण मंडळ (दिल्ली) ही राष्ट्रीय स्तरावरील एकमेव संघटना आहे.

ही संघटना पोलीस प्रशासनास मदत करते तसेच समाजातील गोरगरीब व वंचित घटकांना मोफत कायदेशीर सल्ला तसेच मदत करण्यास सदैव तत्पर असते.

या माध्यमातून देशातील पोलीस प्रशासनास मदत करण्यास व गरजू व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ.निलेश राणे यांनी सांगितले आहे.

तसेच डॉ.निलेश राणे यांची नुकतीच उत्तर यूरोप मधील इस्टोनिया विद्यापीठाकडून पीएचडी ही पदवी पूर्ण केली आहे, तसेच राष्ट्रीय स्तरावर सामाजिक व क्रीडा क्षेत्रात सुद्धा त्यांचे अनमोल योगदान आहे. तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासंदर्भात देखील डॉ.निलेश यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे.

ही नियुक्ती झाल्याबद्दल देश व राज्याभरातून राजकीय, क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.