सोलापुरात लग्नास नकार दिल्याने आतेबहिणीचा गळा आवळून खून.
सोलापुर:- सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या लग्नाला आईने नकार दिल्याच्या रागातून तरुणाने 11 फेब्रवारी रोजी आतेबहिणीचा गळा आवळून खून केला. ज्योतिबा अशोक गायकवाड असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. सोलापूर शहर एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुनीता कुसेकर असं मृत आतेबहिणीचं नाव आहे. तीन महिन्यांपूर्वी ज्योतिबा गायकवाड याने मृत सुनिता कुसेकरच्या आईकडे जाऊन लग्नासाठी मागणी घातली होती. तेव्हा सुनिताच्या आईने मुलगी अजून शिक्षण घेत आहे. आताच लग्नाचा विचार नाही, असे सांगत लग्नास नकार दिला होता. याचाच राग मनात धरुन ज्योतिबाने तरुणीचा गळा आवळून खून केला