रायगड मध्ये नवरात्र उत्सवाची धूम

19

रायगड मध्ये नवरात्र उत्सवाची धूम

सार्वजनिकसह खासगी 5106 मूर्ती, घटस्थापना करण्यात येणार

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- गणेशोत्सव नंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सव चे. देवीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये सार्वजनिकसह खासगी असे 5106 मूर्ती, घट आणि प्रतिमा असे स्थापना करण्यात येणार आहे. तर 3 ठिकाणी रावण दहन करण्यात येणार आहे.
गौरी-गणपती सणानंतर भाविकांना वेध लागतात ते नवरात्रौ त्सवाचे. यावर्षी रायगड जिल्ह्यात सोमवारी 22 सप्टेंबर रोजी सार्वजनिकसह खासगी 1387 देवींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यामध्ये 1198 सार्वजनिक, तर 189 खासगी देवींचा समावेश आहे.

या देवींच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये सार्वजनिकसह खासगी असे 3527 घटांची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये 244 सार्वजनिक, तर 3283 खासगी घटांचा समावेश आहे. काही ठिकाणी सार्वजनिकसह खासगी 192 देवींच्या फोटोंची स्थापना करण्यात येणार असून, यामध्ये सार्वजनिक 175, तर खासगी 17 देवींच्या फोटोंचा समावेश आहे. त्याचबरोबर सार्वजनिकसह खासगी 899 देवींच्या मिरवणुका निघणार आहेत,
नवरात्रौत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये स्थानिक पोलिस स्टेशनचा त्यांच्या हद्दीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.