हिंगणघाट सुनेचा छळ करणा-या राठी परीवाराच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल.
हिंगणघाट पोलिस गुन्हा दाखल करणार काय??
आरोपी कधी पर्यंत होईल अरेस्ट??
मिडीया वार्ता न्यूज टिम
हिंगणघाट:– वर्धा जिल्हातील हिंगणघाट मध्ये सासरच्या मंडळीकडुन अनेक वर्षा पासून सुनेचा छळ सुरु असल्याने आज स्वता पिढीत महीला हिंगणघाट पोलिस स्टेशनला जाऊन लेखी तक्रार दिली.
हिंगणघाट शहरांतील उच्चभु व्यवसायीक असलेले सुभाष चौक येथील सावरीया साडीचे संचालक प्रदिप गोवरधन राठी पती, गोवरधन राठी सासरे, उमेश गोवरधन राठी देर, दिलीप गोवरधन राठी देर यांच्या विरोधात प्रदिप राठी यांचा पत्नी प्रियंका प्रदिप राठी यांनी माझे सासरचे लोक माझा बरोबर गैर व्यवहार करतात. माझा सोबत क्रूर व्यवहार करतात. काल रात्री 10 वाजता माझे सासरे गोवरधन राठी आणि देर उमेश गोवरधन राठी हे माझा घरी आले. त्यावेळेस मी आणी माझा मुलगा घरात असतांना मला जीवानीशी मारण्याची धमकी देत मला घर खाली करण्यास सांगीतल. व माझा हात पकडून त्यांनी ओढला ते यावरच थांबले नाही तर माझे सासरे गोवरधन राठी यांनी अगदी खालच्या भाषेत आश्लील भाषेत शिवीगाळ दिली.
आज मी आणि माझा मुलगा घरात एकटी रहाते रात्री बेरात्री सासरची मंडळी घरी येऊन अश्लील शीवी देने जीवानीशी ठार मारण्याची धमकी देने असे नित्याने करत आहे. आता माझी सासरच्या कडुन छळ अत्याचार सहन करण्याची परीसीमा संपली आहे. आज यांनी मला काही केल तर माझा मुलच कस होईल हा विचार मला चुप बसू देत नाही आहे. त्यामूळे मी आज हिंगणघाट पोलिस स्टेशनला स्वता येऊन लेखी स्वरूपात तक्रार देत आहे. अशी प्रतीकीया पिढीत प्रियंका प्रदिप राठी यांनी मिडीया वार्ता न्यूज ला दिली.