लोकशाही जीवनमूल्येच बहूजनांच्या प्रगतीची आधारशीला – प्रा.डाॅ. अरविंद ढोके सर

प्रशांत जगताप प्रतिनिधी
हिंगणघाट:- गुलामांना गुलामीची जाणीव करून त्यांच्यात स्वजाणीवा, आत्मसन्मान अभ्यासामुळेच निर्माण होऊ शकतो. आजचा विद्यार्थी मोबाईल केंद्री झाला आहे. तंत्रज्ञान हे विद्या व विकासाचे प्रतिक आहे. परंतु त्याला प्रज्ञा, शिल या मूल्यांची जोड आवश्यक आहे ,असे दि. १४ फेब्रुवारी २०२१ ला समता समाज केंद्र, पंचशील नगर, काजी वार्ड हिंगणघाट येथे आयोजित बहुजन हिताय अभ्यासिकेचे उद्धघाटन प्रसंगी प्रा.अरविंद ढोके बोलत होते. प्रथम पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहून, थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत बहूजन समाजातील तरूणांना एक विचारपीठ असावं या उदात्त हेतूने ही बहूजन हिताय अभ्यासीका निर्माण करण्यात आली. सध्या सार्वजनिक उद्योगांची होणारी विक्री व वाढती बेरोजगारी यावर विचारमंथन झाले पाहिजे तसेच चुकीच्या गोष्टींचे समर्थन न करता त्याविरुद्ध बंड करण्याचे बळ वाचन व अभ्यासामुळे तयार होते असे मत माजी नगरसेवक अशोकजी रामटेके यांनी व्यक्त केले. तर माणूस हा जीवनमूल्ये निर्माण करणारा प्राणी आहे, त्यासाठी सम्यक दृष्टिकोणातून देशातील आव्हानांकडे पाहिले पाहिजे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डाॅ.तक्षशिल सुटे यांनी मांडले याप्रसंगी मंचावर प्रा.डाॅ. महेश म्हैसकर, प्रा. प्रदिप लोहकरे, प्रा. अरूण भगत, प्रा. डॉ. इंगोले सर उपस्थित होते.
सूत्रसंचालन विजय तामगाडगे तर आभार प्रदर्शन डॉ. बी.आर.आंबेडकर सांस्कृतिक मंच अध्यक्ष राजकुमार मेश्राम यांनी पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता व्यवस्थापक म्हणून माजी अध्यक्ष सुरेश लोणारे व प्रशांत मेश्राम, नितीन जांभूळकर, प्रफुल मेश्राम, स्वप्नील बाराहाते, धिरज ईंदुरकर, मुन्ना शिंपी, नरेश तामगाडगे, निलेश जांभूळकर इतर कार्यकर्ते तथा युवा वर्ग व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.