विहुले ग्रामस्थांचा ग्रामपंचायत सदस्यांसहित भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश.

16

विहुले ग्रामस्थांचा ग्रामपंचायत सदस्यांसहित भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश.

तळाशेत जि.प.गटातील साई पंचायत समिती गणामध्ये भाजपाची जोरदार हवा.

विश्वास गायकवाड
बोरघर, माणगाव प्रतिनिधी
९८२२५८०२३२

माणगाव तालुक्यातील साई पंचायत समिती गणामधील विहुले गावातील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाकडे प्रभावीत होऊन भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करत असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.दीपाली दरेकर यांच्यासमवेत जेष्ठ मार्गदर्शक जनार्दन शंकर महाडिक, निलेश भाई दळवी,दिलीप दरेकर,चंद्रकांत पवार,विजय विहुळेकर,विजय महाडिक,भाई दळवी,संतोष विहुळेकर,प्रकाश अंधेरे,अशोक सुर्वे,नरेश अंधेरे,धोंडू घाडगे,दीपाली दरेकर,प्रियांका अंधेरे,विजया विहुळेकर,द्रौपती विहुळेकर,मिनाआई विहुळेकर,निर्मला दळवी, चित्रा पवार,निलिमा पवार,जानकी पवार,संजय विहुळेकर व इतर ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी भाजपा हा केवळ एक पक्ष नसून परिवार आहे व परिवारातील नवीन सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत करतानाच ग्रामस्थांना अभिप्रेत असणारी विकासकामे व सामाजिक पाठबळ देण्याचे काम भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात येईल,केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना प्रत्येक गावागावात पोहोचवून समाजातील शेवटच्या घटकाला त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता झटणार असल्याचे भाजपा युवक जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी जेष्ठ नेते कुर्ले अण्णा,संजय आप्पा ढवळे,महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपाली कासारे,माणगाव तालुका अध्यक्ष परेशजी सांगले,महिला मोर्चा अध्यक्षा रचना थोरे,सरचिटणीस बाबुराव चव्हाण,तालुका उपाध्यक्ष सुधीर म्हामुणकर,महादेव कदम,संतोष कळंबे,शहराध्यक्ष राकेश जाधव,अनिल दांडेकर,आत्माराम डवले,नयन पोटले,युवा मोर्चा सरचिटणीस श्रीराम कळंबे,केतन अडीत,अमोल पवार,नितीन शेलार,निखिल साळुंखे,राजू तेटगुरे,अनिल सत्वे,अनिकेत कांबळे उपस्थित होते.यापक्षप्रवेशाकरिता तालुकाउपाध्यक्ष सुधीर म्हामुणकर,निलेश दळवी व जनार्दन महाडिक यांनी विशेष प्रयत्न केले असून विभागामध्ये भाजपा जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचे दिसत आहे.