सिंदेवाही येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा.

11

सिंदेवाही येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा.

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909 

सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांनी महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचे शासन निर्णय दिनांक 01 सप्टेबर 2025 नुसार महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व पारदर्शक होण्याकरीता भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत सेवा पंधरवडा सिंदेवाही तालुक्यात साजरा करण्यात येत आहे.

पहिला टप्पा दिनांक 17 सप्टेबर 2025 ते 22 सप्टेबर 2025 पाणंद रस्तेविषयक मोहिम

महाराष्ट्र शासन महसुल विभाग शासन निर्णय क्र. लवेस्-2025 प्र.क्र.458/भूमापन ल-1 दिनांक 29/08/2025 नुसार सिंदेवाही तालुक्यातील सर्व पाणंद रस्त्यांची रस्त्याच्या प्रकारानुसार ग्राम महसुल अधिकारी यांनी प्रपत्र 1 व 2 मध्ये माहिती या कार्यालयात सादर केले आहे. तसेच सदर रस्त्याची माहिती तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक 17 सप्टेबर 2025 रोजी विशेष सभेचे आयोजन करुन सभेत सर्व रस्त्याचे वाचन करण्यात आले. त्यानुषंगाने ग्राम महसुल अधिका-यांनी तयार केलेल्या रस्त्याचे प्रपत्र 1 व 2 नुसार दिनांक 19/09/2025 पासून उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय सिंदेवाही यांचे कार्यालयाकडून सिमांकण करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

सिंदेवाही तालुक्यातील अतिक्रमण असलेले पांणद रस्ते अतिक्रमण विरहीत करण्याकरीता रस्ता अदालत दिनांक 23/09/2025 पासुन मौजा टेकरी, वाकल व वानेरी या गावापासुन सुरुवात करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील अतिक्रमण असलेल्या रस्त्यांचे रस्ता अदालती मध्ये अतिक्रमण निष्कासीत करण्यात येणार असल्याचे संदीप पानमंद तहसिलदार, सिंदेवाही यांनी केले आहे