Muddy water supply due to neglected water in Kalmeshwar - Prashant Ikhar
Muddy water supply due to neglected water in Kalmeshwar - Prashant Ikhar

कळमेश्वरात पालिकेच्या दुर्लक्षित पणामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा – प्रशांत ईखार

पालिका प्रशासन “ऑल इज वेल” च्या तोऱ्यात

 Muddy water supply due to neglected water in Kalmeshwar - Prashant Ikhar

युवराज मेश्राम प्रतिनिधी

कळमेश्वर:- गेल्या 15 दिवसापासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या योग्य नियोजनाअभावी व दुर्लक्षित पणामुळे शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असून शहरातील नागरिक त्रस्त झाले आहे. सध्यातरी पाणीपुरवठा विभागात तारतम्य नसल्याचे निदर्शनास येते. सर्वसामान्य नागरिकांना मात्र पालिकेची फिल्टर प्लांट सह यंत्रणा फेल तर पडली नाही ना असा सवाल नागरिकांनी केला आहे .परंतु पालिका प्रशासन ” ऑल इज वेल ” तोऱ्यात वावरत आहे.

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना या दूषित पाण्याबाबत तक्रार कुणाकडे करावी. हे मात्र कळेनासे झाले आहे. पालिकेमध्ये कार्यरत पाणीपुरवठा अभियंता मात्र पालिकेत मिळतच नाही. फोनकॉल केला तर उचलत नाही. ही खरी शोकांतिका असल्याचे नागरिक बोलतात.

कळमेश्वरात पालिकेचा सूसज्ज वॉटर ट्रीटमेंट फिल्टर प्लांट दिमाखात उभा आहे. परंतु या प्लांटमध्ये प्रशिक्षित कर्मचारी नसल्याची तसेच लाखो रुपये खर्चून निर्माण करण्यात आलेला आलेला पालिकेचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट च कुचकामी ठरत असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. कुठल्याही कंटकदारा मार्फत करा मार्फत ट्रेनिंग दिले जात नाही असा सावळा गोंधळ सुरू असल्याची सर्वत्र चर्चा आहे. सध्या येत असलेल्या गढूळ पाण्याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कळमेश्वर पालिका कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी पाईपलाईन फुटल्याने गढूळ पाणी येत असल्याची माहिती प्राप्त झाली असून हे पाणी किती दिवस पर्यंत गढूळ येणार हे मात्र कुणीही सांगू शकत नाही याला जवाबदार कोण पालिका मुख्याधिकारी, पालिका पाणीपुरवठा कंत्राटदार, की पालिकेचा पाणीपुरवठा विभाग ?

कळमेश्वरातील शासकीय व खाजगी रुग्णालयात गॅस्ट्रोच्या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती माहिती प्राप्त झाली आहे. पालिकेत स्थायी व मुख्यालयी मुख्याधिकारी राहत नसल्याने सर्व गोंधळ पालिकेचाच्या मुख्याधिकारी मुख्यालयाला राहत नसल्याने कर्मचारी वर्गावर कुठलाही वचक नसल्याने नागरीकांना मूलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत असून कळमेश्वर पालिकेला स्थायी व मुख्यालयी राहणारा मुख्याधिकारी तातडीने देण्यात यावा व शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत इखार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here