चारोटी टोलनाक्यावर कासा पोलिसांची धडक कारवाई

20

चारोटी टोलनाक्यावर कासा पोलिसांची धडक कारवाई

५ लाख ७० हजारांचा गुटखा जप्त, तीन आरोपी अटकेत

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755

कासा :- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कासा पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल ५ लाख ७० हजारांचा बंदी असलेला गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजता चारोटी टोलनाक्यावर करण्यात आली.
सुरतहून मुंबईच्या दिशेने जाणारी प्रवासी गाडी (क्रमांक जी.जे-१९-व्हाय-८४५३) टोलनाक्यावरून जात असताना ती संशयास्पद वाटल्याने कासा पोलिसांनी अडवली. तपासणीदरम्यान गाडीत मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला. अंदाजे ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा हा साठा ताब्यात घेण्यात आला.
या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून संबंधित गाडी जप्त करण्यात आली आहे. आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या प्रकरणामुळे गुटखा तस्करांना मोठा धक्का बसला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथक, पालघर व कासा पोलिस स्टेशनचे निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज चव्हाण यांनी केली. कासा पोलिसांच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करीवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.