अलिबाग मधील देवीचे विविध रूपे

51

अलिबाग मधील देवीचे विविध रूपे

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५

अलिबाग: अलिबाग मध्ये नवरात्र उत्सव विविध मंडळातर्फे अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. मंडळामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत देवीची आरती सकाळी व संध्याकाळी नित्य नियमाने घेतली जात आहे गरबा नृत्य अत्यंत शिस्त बद्ध साजरे केले जात आहेत. देवीं चे रूपे अत्यंत सुंदर रेखीव व देखणे आहेत

शिवराय मंडळाने अतिशय सुंदर देवीचे रूप व मंदिर देखावा अप्रतिम साजरा केला आहे.

शितोळे आळी मध्ये पारंपारिक देवीच्या मुख वट्याची स्थापना केलेली आहे, प्रत्येक भक्ताला प्रसाद व सुवासिनी साठी हळदी कुंकू लावण्यात येत आहे. सोबतच नेहमी प्रमाणे त्यांनी चल चित्रांचा देखावा उभारला आहे तो पाहण्यासाठी सायंकाळी बऱ्यापैकी गर्दी जमा होते.

घरात आळी मध्ये दुर्गाई देवीचे सुंदर, मनमोहक रूप डोळे भरून पाहिल्या नंतर भक्तांचे मन प्रसन्न होऊन जाते.

सर्व मंडळे नियमांचे पालन करत नवरात्र उत्सव अत्यंत आनंदात साजरे करत आहेत.