प्राचार्य डि. आर. पाटील आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

35

प्राचार्य डि. आर. पाटील आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

म्हसळा: संतोष उध्दरकर.

म्हसळाःन्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू धरमचंद्र रावसाहेब पाटील यांना माधवबाग हॉस्पिटल,खोपोली आयोजित जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .अतिशय शिस्तप्रिय व गुणवंत आणि त्यांची कार्य करण्याची उल्लेखनीय पद्धत,पालकांच्या भेटी घेऊन शाखेसाठी आर्थिक मदत व विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळोवेळी दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न,योग्य वेळेचे नियोजन,इयत्ता दहावी व स्पर्धा परीक्षा गणित विषयाचे मार्गदर्शन,इत्यादी कार्य पाहून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य डी. आर. पाटील यांनी हा सन्मान म्हणजे बापुजींचा आशीर्वाद आहे. मला मिळालेला पुरस्कार मी बापूजीच्या चरणी अर्पित करतो असे उद्गार काढले. तसेच पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे ,सचिवा शुभांगी गावडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे ,विद्या समितीचे अध्यक्ष व आजीव सेवक श्रीराम साळुंखे ,रायगड, ठाणे,पालघर,वाशी चे विभागप्रमुख व प्राचार्य गलांडे यु.एस ,स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन समीर बनकर व स्कूल कमिटीचे सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सर्व सदस्य यांनी पुष्पगुच्छ, शाल देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.