चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मांना श्रद्धांजली*
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
९८३३५३४७४७
पनवेल :- चिरनेर हे रायगड जिल्ह्यतील उरण तालुक्यातले एक गाव.
२५ सप्टेंबर १९३० रोजी इंग्रज राजवटीत इंग्रजांनी चिरनेर परिसरातील गावात हक्काच्या जंगलावरील लाकडे तोडण्यास गावकऱ्यांस विरोध केल्याने गावांतील शेतकरी, कष्टकऱ्यांनी अवजारे हातात घेऊन इंग्रजांचा जंगल कायदा तोडून सत्याग्रह केला. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, त्या चळवळीला पाठिंबा देत उरणमधील शेतकऱ्यांनीही आपल्या जिवाची पर्वा न करता सत्याग्रह करून इंग्रजांप्रती आपला रोष व्यक्त केला होता.
यात इंग्रजांनी केलेल्या अमानुष गोळीबारामुळे व मारहाणीमुळे अनेक जण अपंग झाले तर अनेक जणांना हौतात्म्य पत्कराव लागलं होत. या हुतात्म्यांचा आज स्मृतिदिन निमित्त ग्रामपंचायत चिरनेर, रायगड जिल्हा परिषद आणि उरण पंचायत समिती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी पनवेल चे आमदार श्री. प्रशांत ठाकूर,उरणचे आमदार श्री. महेश बालदी , भाजप जिल्हाध्यक्ष श्री अविनाश कोळी उपस्थित होते.