माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा जीवन गौरव पुरस्काराने होणार सन्मान

24

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा जीवन गौरव पुरस्काराने होणार सन्मान

कृष्णा गायकवाड
पनवेल तालुका प्रतिनिधी
9833534747

मुंबई :- लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना एका मराठी वृत्तपत्राच्या वर्धापन दिना निमित्त जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मंत्री अदिती तटकरे, ज्येष्ठ संपादक मधुकर भावे, दै. लोकमतचे संजय आवटे तसेच पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून, शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह, मार्केट यार्ड येथे सायंकाळी 4:30 वाजता संपन्न होणार आहे.