जिल्हाधिका *-यांनी घेतला उद्योग विभागाचा आढावा लॉजिस्टिक पार्कला गती देण्याचे निर्देश

12

जिल्हाधिका *-यांनी घेतला उद्योग विभागाचा आढावा
लॉजिस्टिक पार्कला गती देण्याचे निर्देश

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो:- 7498051230

चंद्रपूर, दि. 26 :- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेत जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हास्तरीय निर्यात प्रचलन परिषद, स्थानिक लोकांना रोजगार आणि सामाजिक दायित्व निधीबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगविषयक संघटनाचे पदाधिकारी, अल्ट्राटेक, धारीवाल, लॉयड मेटल इत्यादी अनेक कंपन्याचे प्रतिनिधी, संबंधित कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असून जिल्ह्यात उद्योगांना सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. जिल्ह्यातील निर्यातवाढी करीता मुल येथे प्रस्तावित असलेले लॉजिस्टीक पार्कला गती देण्यात यावी. तसेच चंद्रपूर मध्ये जेपी असोसिएशन ही टेस्टींग लॅब व बँक ऑफ इंडीया चंद्रपूर येथे परकीय चलन कक्ष प्रस्तावित असून चंद्रपूर जिल्ह्यातील निर्यात वाढीकरीता खुप फायदेशिर ठरणार आहे. एमआायडीसी क्षेत्रातील उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांनी संबधित विभागांना दिल्या.

सर्व कंपन्यांनी दरवर्षी स्थानिकांना रोजगाराबाबतचा अहवाल महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे सादर करावे व उद्योगामध्ये जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य द्यावे. सन 2024-25 मध्ये खर्च केलेल्या सीएसआर निधीबाबत तसेच सन 2025-26 च्या खर्च नियोजनाबाबत अहवाल महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांना सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

नवउद्यो्गासाठी एमआयडीसी मधील भुखंड उपलब्ध बाबतची माहिती chanda.nic या जिल्हा संकेतस्थाळावर अपलोड करावी. तसेच प्रस्तावित असलेल्या रेडियल वेल बंधाऱ्याचे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे कार्यकारी अभियंता पाठबंधारे विभाग यांना निर्देश देण्यात आले. एमआयडीसी मधील व समोरील रस्ते दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश देण्यात आले. औद्योगिक घटकांना नियमित विद्युत पुरवठा होण्याकरीता नविन फीडर बाबत महावितरणला सुचना देण्यात आल्या.