इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन महाराष्ट्र कोकण विभाग वार्षिक सभा संपन्न

25

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन महाराष्ट्र कोकण विभाग वार्षिक सभा संपन्न

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747

मुंबई :- इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचं कोकण विभागाची 6 वी वार्षिक सभा पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उल्हास वजरे यांनी भूषवले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत गद्रे यांनी पार पाडले. विद्युत क्षेत्रात काम करत असताना नवनवीन तंत्रज्ञान अवगत करणे तसेच विकसित तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आवाहन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.उमेश रेखे यांनी येथे बोलताना केले.
यावेळी मुंबई संघटनेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे अहिल्यानगर अध्यक्ष श्री.अर्जुन ससे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष श्री.शहाजी पाटील, धुळे नंदुरबार अध्यक्ष श्री. किरण पेंढारकर, तसेच श्री.भिसे, श्री.राजू वाकोडे आणि महाराष्ट्र भारातून सहकारी यावेळी उपस्थित होते.