मंत्री आदिती ताई तटकरे यांनी घेतले आदिशक्ती दुर्गा मातेचे दर्शन

11

मंत्री आदिती ताई तटकरे यांनी घेतले आदिशक्ती दुर्गा मातेचे दर्शन

म्हसळा: संतोष उद्धरकर.

म्हसळा: म्हसळा शहरातील बेलदार वाडी इथे दरवर्षी प्रमाणे यंदाही नवतरुण मित्र मंडळ बेलदार वाडी यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, विधिवत पुजा करून दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते, तसेच नऊदिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी माहिला बाल कल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी भेट देऊन आदिशक्ती दुर्गा मातेचे दर्शन घेतले, यावेळी मंडळाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन आदितीताई तटकरे यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी बोलतांना मंत्री आदितीताई तटकरे यांनी मंडळाचे कौतुक करून नवरात्र उत्सव आनंदात साजरा करीत आहात, या सभागृहाचे उद्‌घाटन झालेले नाही व ही वास्तु लोकर्पणकरण्या अगोदरच या वास्तुत आदिशक्ती दुर्गा मातेचे आगमन होऊन आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे व नवरात्रोत्सव साजरा होत आहे याचे मला विषेश आनंद होत आहे, त्यामुळे हा लोकार्पण कार्यक्रम नंतर करण्याचे तटकरे यांनी सांगितले. मंडळाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे आभार मानण्यात आले.यावेळी उपस्थित नगराध्यक्षा फरहीन बशारत, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, स. पो. नि. संदीप कहाळे,तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, जि.प. माजी कृषी सभापती बबन मनवे, माजी सभापती संदीप चाचले, उपपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे,माजी नगराध्यक्ष संजय कर्णिक, पाणी पुरवठा सभापती सुनिल शेडगे, निकेश कोकचा, वनिता खोत, वृक्षाली घोसाळकर, मिना टिंगरे, एकता नवतरुण मित्र मंडळ अध्यक्ष शरद चव्हाण, उपाध्यक्ष गणेश जाधव, सचिव रंजित चव्हाण, गणेश चव्हाण, खजिनदार सागर चव्हाण, प्रकाश पाडावे, दिपक चव्हाण, रोहित चव्हाण, प्राची चव्हाण, अस्मिता चव्हाण,सुमन चव्हाण, लिला चांदोरकर, किशोरी पाडावे, दिपाली जाधव, संजना चव्हाण, श्वेता चव्हाण, राजश्री चव्हाण, दिपाली चव्हाण,लता मोरे, मंगला जाधव. तसेच महिला मंडळ, नवतरुण मित्र मंडळाचे सर्व सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.