ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत

17

ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत

कृष्णा गायकवाड
ठाणे —–

ठाणे :- ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली सन 2025- 26 साठी 1252.99 कोटींच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीए तज्ञ समिती नेमणार आहे या समितीच्या माध्यमातून वाहतूक कोंडीबाबत अभ्यास करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा करण्यात येईल असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
1) सर्व प्राथमिक केंद्राचे स्मार्ट आरोग्य केदारत रूपांतर करणे.
2) वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी ड्रोन व AI आधारित ट्राफिक मॅनेजमेंट प्रणाली विकसित करणे.
3) सौर ऊर्जेदारे शासकीय कार्यालयांचे शौरीकरण करणे. (Roof top Solar)
4) ठाण्यातील 39 पर्यटन स्थळांचा विकास आराखडा व Exolorer Thane – Tourism App तयार करणे.
5) छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठ, मराठी पाढा विकास आराखड्यासाठी 80 कोटींच्या तरतुदीला मंजुरी.
6) तालुका क्रीडा संकुल, सेवा संवाद ,राज भूमी पोर्टल, स्वयंरोजगारातून विकास आदी उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी काळू धरणाच्या कामाला गती देण्याचे निर्णय या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ,कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ,ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के, भिवंडी लोकसभा संघाचे खासदार सुरेश म्हात्रे ,आमदार डॉ. बालाजी केळीकर, शांताराम मोरे ,राजेश मोरे जिल्ह्यातील इतर सन्माननीय आमदारआणि वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.