Home latest News नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचा नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन माननीय सरन्यायाधीशांच्या हस्ते
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचा नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन माननीय सरन्यायाधीशांच्या हस्ते
मीडिया वार्ता न्यूज वृत्तसेवा
नाशिक :- नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन तसेच न्यायालयाच्या १४० वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन पोलिस परेड मैदान, शरणपूर रोड, नाशिक येथे भव्यदिव्य पद्धतीने पार पडले.
या सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मा. श्री. चंद्रशेखर यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायव्यवस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे प्रतीक असलेल्या या नवीन इमारतीमुळे न्यायालयीन सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील या महत्त्वपूर्ण क्षणाचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी मिळणे हे खरोखरच मला अभिमानास्पद आहे. १४० वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा वारसा आणि आधुनिक न्यायसुविधांच्या उभारणीचा हा संगम निश्चितच नाशिकच्या न्यायालयीन इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल, यात शंका नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं मत वक्त केलं.
याठिकाणी उच्च न्यायालयाचे अनेक मान्यवर न्यायमूर्ती,न्यायव्यवस्थेमधील अधिकारी आणि विधीज्ञ यावेळी उपस्थित होते.
तसेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. नरहरी झिरवाळ, क्रीडा मंत्री श्री. माणिकराव कोकाटे, नाशिकचे विद्यमान खासदार श्री. राजाभाऊ वाजे, आमदार सीमाताई हिरे, आमदार श्री. हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे यांसह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी,वकील व नाशिककर नागरिक उपस्थित होते.