चला एकत्र राहूया
चला विजयी भगवा लावूया!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नारा. नवी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्याला केले संबोधित.
कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747
नवी मुंबई: – लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गट)आणि महायुतीचा विजय भगवा फडकवायचा आहे. यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते.
श्री. एकनाथजी शिंदे यांनी केले. आज नवी मुंबईत मोठ्या उत्साहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी श्री.एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांना संबोधित केले आणि प्रत्येक घरापर्यंत शिवसेना पोहोचवण्याचा मूळ मंत्र दिला.
यावेळी स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. श्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय चौगुले, उपनेते विजय नाहाटा, शहराध्यक्ष किशोर पाटकर, माजी नगरसेवक ममित चौगुले तसेच शिवसेनेचे माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.