पोलादपूर येथे कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष व सुजय प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

70

पोलादपूर येथे कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष व सुजय प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पोलादपूर तालुका साठि वैद्यकीय मदत कक्ष सदैव तत्पर आहे कृष्णा कदम

 प्रतिनिधी: सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका
8482851532

पोलादपूर : नवरात्र उत्सवानिमित्त कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष आणि सुजय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कॅप्टन विक्रमराव हॉल, पोलादपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

“जगता-जगता रक्तदान, जाता-जाता अवयवदान आणि गेल्यावर नेत्रदान” या प्रेरणादायी संकल्पनेतून आणि “मैत्री रक्ताची” हे ध्येय समोर ठेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलादपूर तालुक्यातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदानासारख्या श्रेष्ठ कार्यात आपला सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केलं. प्रत्येक रक्तदात्याला एक आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक कृष्णा कदम यांनी सांगितले की, “तालुक्यातील कोणत्याही रुग्णाला तातडीची वैद्यकीय मदत लागल्यास कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष खंबीरपणे सदैव तयार आहे.”

या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये —

सामाजिक नेते नरेंद्र राठोड
कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक श्री कृष्णा कदम सुजय प्रतिष्ठान संस्थापक सुरेश सकपाळ तहसीलदार कपिल घोरपडे डॉक्टर राजेश शिंदे
‘आपली माती, आपली माणसं’ संघटनेचे सर्व पदाधिकारी

ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष हरिभाऊ पवार
नरेश सलागरे
पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप भागवत
नगरसेविका श्रावणी शहा
दिशा ग्रुपच्या अध्यक्षा सौ. संगीता मोरे उज्वला शेठ
यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष व सुजय प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने तसेच ग्रामीण रुग्णालय पोलादपूर डॉक्टर अनुज सर व त्यांची टीम वतीने आरोग्य केंद्वारे मेडिसिन तेथे उपलब्ध करण्यात विशेष सहकार्य करण्यात आले करण्यात आले. अशा उपक्रमांद्वारे समाजात वैद्यकीय जाणीव वाढवून रक्तदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे