राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे संविधान जागर कार्यक्रम

8

राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे संविधान जागर कार्यक्रम

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 28 सप्टेंबर
अनुगामी लोकराज्य महा अभियानांतर्गत संविधान पंच्याहत्तरी महोत्सव संविधान जागर कार्यक्रम चे आयोजन राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देवाडाखुर्द‌‌‌ येथे शनिवार, 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दिलीप मॅकलवार तर प्रमुख अतिथी म्हणून सुषमा सुनिल दालवनकर अनुलोम उपविभागीय प्रमुख आणि संदिप बद्दलवार मंचावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सुषमा दालवनकर यांनी संविधान विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची, कर्तव्याची जाणीव निर्माण करुन दिली.
संविधानानुसार कायद्याचे पालन आणि अधिकाराचा वापर कसे करावे याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.विजय लोनबले , प्रास्ताविक प्राचार्य दिलीप मॅकलवार तर आभारप्रदर्शन रविंद्र टिकले यांनी केले.
कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.