फॅन्सी ड्रेस,चित्र कला स्पर्धेला चांगला प्रतिसाद
भागवत जाधव
अलिबाग
नवरात्री उत्सव सगळीकडे जोरदार साजरा केला जात आहे यासाठी विविध मंडळे विविध स्पर्धा चे आयोजन करत आहेत असाही उपक्रम साईनगर मित्र मंडळ यांच्या चित्रकला व फॅन्सी ड्रेस स्पर्धेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला ह्या स्पर्धेमध्ये लहान मुला मुलींनी तसेच युवा तरुण-तरुणी आणि खुल्या गटाने चांगला प्रतिसाद दिला.
चित्र कले स्पर्धेला विविध गटासाठी विविध विषय देण्यात आले होते सर्वांनी एकदम उत्कृष्ट चित्रे काढून रंगविली तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी विविध रूप सादर करून प्रेक्षकांच्या प्रचंड टाळ्या मिळवल्या यामध्ये ज्वलंत विषयावर कला सादर करण्याचा प्रयत्न केला.
परीक्षकांनी सुद्धा यावेळेस कलाकारांचे तोंड भरून कौतुक केले परीक्षक म्हणून परिसरातील नामवंत सौ. पाटील सौ कवळे, व सौ वाटवे मॅडम यांनी परीक्षणाचे काम उत्तम रित्या सांभाळले. साई नगर मित्र मंडळाच्या श्री प्रल्हाद म्हात्रे श्री प्रभाकर माळवदे श्री प्रवीण जाधव व इतर सहकार्याने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत केली.
परिसरातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या कार्यक्रमासाठी लाभला .