अलिबागच्या वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग ची नोटीस.

7

अलिबागच्या वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग ची नोटीस.

महाविद्यालयात अनेक मुख्य तांत्रिक, प्रशासकीय आणि शिक्षणाच्या गुणवत्तेशी संबंधित आढळल्या गंभीर त्रुटी

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबागच्या वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी)ने तांत्रिक, प्रशासकीय आणि शिक्षणाच्या गुणवत्तेशी संबंधित आढळल्या गंभीर त्रुटी आढळल्याने नोटीस काढली असून वैदयकीय महाविदयालयाच्या वेबसाईटवर ही नोटीस प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी दिली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांच्या वार्षिक नूतनीकरणासाठी तपासणी केली असून त्यात राज्यातील 30 वैद्यकीय महाविद्यालयांनी निकषांची पूर्तता केली नसल्याचे आढळले आहे.यामुळे या महाविद्यालयांना करणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. यामध्ये गतवर्षी मान्यता मिळालेल्या 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी मुंबई, अंबरनाथ, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, जालना, बुलढाणा आणि भंडारा या नऊ संस्थांसह सोलापूरमधील डॉ. वैशंपायन मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालय, बारामती, रत्नागिरी, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, सातारा, अलिबाग, जळगाव, मिरज, नंदुरबार, परभणी, सिंधुदुर्ग, नागपूरमधील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळमधील श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरमधील राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळ्यातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील आर्मड् फोर्स वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडमधी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई महानगरपालिकेचे शीव रुग्णालय यांचा समावेश आहे.
का मिळाली अलिबागच्या वैदयकीय महाविदयालयाला नोटीस?
अलीबागमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अंतर्गत स्नातक वैद्यकीय शिक्षण मंडळानेयंदा यशस्वीपणे एमबीबीएस सीट्सचे सशर्त नवीकरण केले आहे. मात्र, आयोगाच्या तपासणीत महाविद्यालयात अनेक मुख्य तांत्रिक, प्रशासकीय आणि शिक्षणाच्या गुणवत्तेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्या असून त्यांचे दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रमुख त्रुटी
विभागांमध्ये आवश्यक तज्ञ शिक्षक आणि रेसिडेंट यांची कमतरता. महाविद्यालयातील दर महिन्याला झालेले मृत्यू यांची आकडेवारी वास्तविक रुग्णवहनाशी जुळत नाही. बाहयरूग्ण उपस्थिती अपेक्षित 2,40,000 असून फक्त 2,26,430 रूग्ण दर्शविले आहेत. शैक्षणिक अभ्यासासाठी आवश्यक 10 शवांपैकी फक्त 4 उपलब्ध आहेत.
क्लिनिकल तपासण्या, विशेषतः क्लिनिकल पॅथॉलॉजी विभागातील, अपेक्षिततः अपुरी आहेत. महाविद्यालयामध्ये एमआरआय सुविधा अजूनही नाही. ऑपरेशन थिएटर संबंधित महत्त्वपूर्ण माहिती अशक्त व अपुरी आहे.
आयोगाचा निर्णय आणि पुढील कारवाई
2024-25 शैक्षणिक वर्षातही या त्रुटींद्वारे कित्येकदा सशर्त नवीकरण करण्यात आले होते.
यंदा या त्रुटी कायम असल्याने, आयोगाने महाविद्यालयाला पुढील चार महिन्यांच्या आत या त्रुटी दुरुस्त करण्याचा आदेश दिला आहे.
चार महिन्यांनंतर पुन्हा तपासणी करून जरूरत भासल्यास कडक कारवाई होणार आहे.
महाविद्यालयाला या निर्णयाविरुद्ध ६० दिवसांच्या आत अपील करण्याचा अधिकार आहे.
महत्त्वाचे परिणाम
या सशर्त नवीकरणामुळे अलीबाग येथे उच्च दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा कायम ठेवण्याची संधी मिळाली आहे. तथापि, त्रुटींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील शिक्षक संख्या, सुविधा, शैक्षणिक व्यवहार आणि व्यवस्थापन यामध्ये लवकरच सुधारणा होणे आवश्यक आहे, तरच गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्यसेवा टिकवता येईल.
या सर्व प्रकाराबाबत अलिबाग वैदयकीय महाविदयालयाच्या अधिष्ठाता यांची प्रतिक्रीया मिळण्यासाठी वैदयकीय महाविदयालयाचे प्रशासकीय अधिकारी डहाके यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी अधिष्ठाता यांचे स्वीय सहायक प्रसाद उगले यांच्याकडून नंबर घ्या असे सांगीतले. अधिष्ठाता यांचे स्वीय सहायक प्रसाद उगले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी नंबर व्हाट्सअॅप करतो असे सांगून नंबर व्हाट्सअॅप केला नाही. त्यामुळे अलिबाग वैदयकीय महाविदयालयाच्या अधिष्ठाता यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.