कोपरगाव मध्ये पुणतांबा चौफुलीवर वाहतुकीची कोंडी.

11

कोपरगाव मध्ये पुणतांबा चौफुलीवर वाहतुकीची कोंडी.

अतिवृष्टीमुळे कोपरगाव मध्ये प्रवाशांचे हाल.

मीडिया वार्ता न्यूज.
सुनील भालेराव.
अहिल्यानगर: कोपरगाव.
9370127037

दि.30.9.25.
अहिल्यानगर :पोहेगाव.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे.
या पावसामुळे कोपरगाव मधील गोदावरी नदीला महापूर आलेला आहे तसेच ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे.
अतिवृष्टीमुळे कोपरगाव परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झालेले आहेत. तसेच अहिल्यानगर मधील नगर मनमाड हायवे. कोपरगाव येथील पुणतांबा चौफुली येथे रस्त्याचे काम अर्धवट राहिलेले आहे तसेच उड्डाणपुलाचे काम बाकी आहे. या रस्त्यावर भरपूर प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरपूर प्रमाणात साचलेले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शाळेचे विद्यार्थी कॉलेज महाविद्यालयातील विद्यार्थी यांना येता जाताना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
कोपरगाव मधील खराब रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
आज गोदावरी नदीचा पूर थोडा कमी झालेला आहे. तरीदेखील पुणतांबा चौफुलीवर रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे
अवजड वाहने तसेच लहान मोठी सर्व वाहने यांच्यामुळे आज पूर्ण ट्राफिक जाम झालेली आहे. पुणतांबा चौफुली पासून तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांचा रांगा उभ्या होत्या.
कोपरगाव ते येवला रोड पर्यंत चार ते पाच किलोमीटर वाहतूक ठप्प झाली होती.
एकीकडे पावसाने गोरगरीब जनतेचे संसार उघड्यावर पडले. हे एक मोठे संकट उभे राहिले आहे.
तर दुसरीकडे रस्ते खराब असल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. तसेच अहिल्यानगर मधील अनेक तालुक्यांमध्ये शेतामध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. अनेक ठिकाणी शेळ्यांवर हल्ला होत आहे. तर कोणाच्या गाईंवर हल्ला होत आहे. काही ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. या अनेक समस्यांना तोंड देऊन नागरिक हातबल झाले आहेत. शेतकऱ्याची नुकसान भरपाई असेल. किंवा बिबट्याच्या हल्ल्यात काही नुकसान झाले असेल किंवा तालुक्यातील रस्ते खराब असतील याकडे लवकरात लवकर सरकारने लक्ष द्यावे. असा जनक आक्रोश कोपरगाव तालुक्यामधून बघायला मिळत आहे.
🔹🔹🔹