Home latest News महामार्गाच्या दुरावस्थेकडे यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी तो थेट खड्ड्यातील डबक्यात उतरला….
महामार्गाच्या दुरावस्थेकडे यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी तो थेट खड्ड्यातील डबक्यात उतरला….
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- शासनाचे काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण प्रचलित आहे. सध्या अलिबाग मधील रहिवाशी आणि पर्यटकांना अनुभव येत आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असलेल्या या अलिबाग वडखळ महामार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून डबकी तयार झाली आहेत. मात्र खड्डे बुजवण्याकडे आणि रस्त्याच्या दुरुस्तीकडे यंत्रणांचा दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रश्नाकडे यंत्रणांच लक्ष वेधण्यासाठी अलिबाग मधील तरुण महामार्गावरील एका भल्या मोठा खड्ड्यातील डोक्यात उतरला. डबक्यात साचलेल्या पाण्यात पोहून त्याने महामार्ग विभागाच्या उदासीनतेचा निषेध केला.
मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अलिबाग मध्ये दर आठवड्याला वीस ते पंचवीस हजार पर्यटक भेट देत असतात. यातून पर्यटन व्यवसायाला चालना मिळत असते. स्थानिक अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होत असते. मात्र सध्या अलिबाग कडे येणाऱ्या मुख्य रस्त्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. महामार्गावर धरमतर तीनवीरा, वेश्वी, वाडगाव, चेंढरे परिसरात ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे खड्ड्यांचा जाच सध्या सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
रस्त्यावरील खड्डयांच्या त्रासाने हैराण झालेल्या अलिबागमधील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी काही दिवसांपूर्वी एकत्र येत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकारयांची भेट घेवून चांगलेच धारेवर धरले. शाल श्रीफळ देवून त्यांचा सत्कारही केला. त्यानंतर ओशाळलेल्या अधिकारयांनी तातडीने काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. पण खड्डे भरण्याचा काम पूर्ण झाल नाही.
महामार्गाच्या मजबुतीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले असून यासाठी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे काम देवकर अर्थमुव्हर्स या कंपनीला देण्यात आले आहे. ईपीसी मोडवर रस्त्याचे मजबुतीकरण केले जाणार असून त्यासाठी कंपनीने मंजूर निधी पेक्षा ४३ टक्के कमी दराने निविदा भरली असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. हे काम तातडीने सुरु करण्यात येईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी यावेळी दिली होती.
त्यानुसार या रस्त्याच्या दुरूस्तीचे कामही सुरू झाले होते. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे आणि संथगतीने सुरू होते त्यावर अलिबागकरांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने दुरूस्तीच्या कामाला खो बसला. त्यामुळे व्यथित झालेल्या स्वप्निल नाईक यांनी आज खड्ड्यामधील डब्यात उडी मारून आंदोलन केले. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढारी यांच्या अनास्थेचाही यावेळी निषेध केला. गेली दोन वर्ष या रस्त्याची दुरावस्था आहे पण यंत्रणा लक्ष देत नाही त्यामुळे हे आंदोलन करत असल्याचा त्यांनी सांगितले.