विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रम – सेवा पंधरवाडा २०२५

23

विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रम – सेवा पंधरवाडा २०२५

तरुणांमध्ये देशभक्ती, नेतृत्व आणि सकारात्मक सहभागाची भावना निर्माण होणे गरजेचे

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747.

पनवेल- ता २९ : भारत सरकारच्या युवा व्यवहार विभाग, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सादर केलेल्या चांगू काना ठाकूर कॉलेज, खांदा कॉलनी, येथे विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २०४७ मध्ये विकसित भारताच्या दृष्टिकोनातून तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी, युवा सहभाग आणि नेतृत्व वाढवण्यासाठी सेवा पंधरवाडानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हा महत्त्वाचा उपक्रम तरुणांना विकसित भारत @२०४७ या संकल्पनेशी जोडणे, डिजिटल सहभाग आणि माय भारत प्लॅटफॉर्मवर योग्य संधी आणि नेटवर्क निर्माण करणे यावर लक्ष केंद्रित करणारा होता.

तरुणांमध्ये देशभक्ती, नेतृत्व आणि सकारात्मक सहभागाची भावना निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम निश्चितच फायदेशीर आहे , तरुणांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने संवाद साधण्याची संधी मिळाली.असं मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केलं.