खरसई आगरी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा.. शिक्षण, संस्कार आणि ऐक्याचा प्रेरणादायी उत्सव…।
म्हसळा: संतोष उध्दरकर.
म्हसळा: दि.५ ऑक्टो २०२५ रोजी खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ, मुंबई आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा फुलपाखरू मैदान, मागाठाणे, बोरीवली येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सदर सोहळा श्रीमती रुक्मीणी घाणेकर यांच्या प्रमुख उस्थितीती लाभली, यावेळी मुंबई विद्यापिठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, कौन्सिलिंग सायकॉलॉजि तज्ञ मनोहर जाधव यांचे मार्गदर्शन विद्यार्थाना प्रेरणादायी ठरले, परशुराम मेंदाडकर यांनी समाजातील ऐक्य, प्रगती, संस्कार यांचा संदेश देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या,या कार्यक्रमाचे नियोजन महेश घाणेकर यांनी उत्तम प्रकारे केले, तसेच भरत घाणेकर, वरुण घाणेकर यांचे विषेश सहकार्य लाभले, या वेळी खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ, मुंबई कार्यकारिणी परशुराम माळी, मनोज माळी, नारायण मेंदाडकर, यशवंत शितकर, गिरीश पाटील, मनोज म्हात्रे यांच्या प्रयत्नाने आणि समाजबांधवांच्या सक्रिय सहभागामुळे हा विद्यार्थी गौरव सोहळा यशस्वी नाही तर एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय सोहळा ठरला. यावेळी समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.