नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर; महिलांना संधी अलिबाग नगरपरिषद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

19

नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर; महिलांना संधी

अलिबाग नगरपरिषद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर; महिलांना संधी

अलिबाग नगरपरिषद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

  • अँड.रत्नाकर पाटील
  • रायगड ब्युएर चीफ
  • ९४२०३२५९९३

अलिबाग:- र्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. प्रशासनाने वेगाने तयारीदेखील सुरु केली आहे. सोमवारी (दि.6) मंत्रालयात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण व उरण नगरपरिषदा खुला महिला प्रवर्ग तर मुरूड-जंजिरा, रोहा व कर्जत नगरपरिषदा ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरक्षण सोडतीत 67 नगरपरिषदा ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी 34 नगरपरिषदा महिलांसाठी आहेत. तसेच, 23 नगरपरिषदा अनुसुचित जाती जमातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

  • खुला महिला प्रवर्ग
  • अलिबाग, पेण, उरण,
  • ओबीसीसाठी राखीव
  • पोलादपूर, खालापूर, , तळा, 
  • ओबीसी महिलांसाठी राखीव
  • मुरूड-जंजीरा, कर्जत, रोहा