Pratap, a clerk and a former manager, embezzled Rs 60 lakh from Rashtrasant Tukdoji Patsanstha.
Pratap, a clerk and a former manager, embezzled Rs 60 lakh from Rashtrasant Tukdoji Patsanstha.

राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्थेत साठ लाखांची अफरातफर, लिपिक आणी माजी व्यवस्थापकाचा प्रताप.

ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत 2016 पासून अमोल अरुण मेहरकुरे मुख्य लिपिक म्हणून काम करीत होते. त्यांच्या या घोटाळ्यात हात आहे. सोबतच माजी व्यवस्थापक मारोती पेंदोर 31 ऑगस्ट 2020 पर्यंत या पतसंस्थेत कार्यरत होते. पेंदोर यांच्या स्वाक्षरीशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार होत नव्हते. 

Pratap, a clerk and a former manager, embezzled Rs 60 lakh from Rashtrasant Tukdoji Patsanstha.
Pratap, a clerk and a former manager, embezzled Rs 60 lakh from Rashtrasant Tukdoji Patsanstha.

चिमूर:- चंद्रपूर जिल्हात राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याने सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील मुख्य लिपिक आणि माजी व्यवस्थापक यांनी केला. जवळपास साठ लाख रुपये या दोघांनी हडप केल्याची माहिती आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत 2016 पासून अमोल अरुण मेहरकुरे मुख्य लिपिक म्हणून काम करीत होते. त्यांच्या या घोटाळ्यात हात आहे. सोबतच माजी व्यवस्थापक मारोती पेंदोर 31 ऑगस्ट 2020 पर्यंत या पतसंस्थेत कार्यरत होते. पेंदोर यांच्या स्वाक्षरीशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार होत नव्हते. 

या कालावधीत दीड लाख रुपयांचा लाभांश रक्कम कार्यालय भाडे सहपत्रानुसार नमूद केलेल्या व्यक्तींच्या चालू खात्यात परस्पर मेहरकुरे आणि पेंदोर यांनी वळती केले. याची तक्रार चिमूर पोलिस ठाण्यात करण्यात आली. संस्थेतील जवळपास साठ लाख रुपयांची रक्कम संगणकद्वारे वेगवेगळ्या खात्यात वळती करण्यात आले. मात्र, त्यांची नोंद दैनिक रोजनिशी बुकात नाही. मुख्य लिपिक अमोल मेहरकुरे यांचे वडील याच संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. 

त्यांच्या आणि परिवारातील काही सदस्य, मित्रांच्या खात्यात संस्थेची रक्कम वळती केली आहे . या संस्थेचे लिपिक व माजी व्यवस्थापक यांनी संगनमताने संस्थेत आर्थिक घोळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात ठाणेदार रवींद्र शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता प्रकरण चौकशीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here