राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त जिल्हा क्रीडा संकुल नेहुली येथे स्वच्छता मोहीम संपन्न……

38

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त जिल्हा क्रीडा संकुल नेहुली येथे स्वच्छता मोहीम संपन्न……

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त जिल्हा क्रीडा संकुल नेहुली येथे स्वच्छता मोहीम संपन्न......

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२९३२५९९३

अलिबाग:-
मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार, रायगड- अलिबाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग, स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग यांच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल नेहुली या ठिकाणी जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेत सहभागी झालेल्या युवक-युवतींनी जिल्हा क्रीडा संकुल परिसराची स्वच्छता केली. यावेळी प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी, प्रिझम संस्थेचे कार्यकर्ते, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे प्रतिनिधी व स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.