डॉक्टर खत्री महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विविध उपक्रम
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 6 ऑक्टोबर
स्थानिक डॉ . खत्री महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
24 सप्टेंबर या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथील डॉ. कोंड्रा यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे होते. 22 सप्टेंबरला भारताचे पहिले उपराष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करण्यात आले. या अनुषंगाने प्रा. एल. एस. नुत्यलवार यांनी मार्गदर्शन केले. 23 सप्टेंबरला स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करून प्रा. एस. आर. लोनबले यांनी त्यांच्या कणखर नेतृत्वाबद्दल मार्गदर्शन केले. 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्राध्यापक नुत्यलवार यांनी जयंती निमित्त मार्गदर्शन केले. 26 सप्टेंबरला जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे उद्देशाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. जी. ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
27 सप्टेंबरला विश्व पर्यटन दिवस साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून त्यांना अभिवादन करण्यास आले. प्रा. नुतलवार यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. 28 सप्टेंबरला शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. टी. डी. कोसे यांनी मौलक असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी अध्यक्ष स्थानी विज्ञान शाखाप्रमुख प्रा. आर. के. राजूरकर होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या साप्ताहिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी परिसर स्वच्छता या विषयावर पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम काकडे तसेच संस्थेचे सचिव डॉ. एस. बी. कपूर यांच्या कुशल मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेचा हा साप्ताहिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोज निरंजने सहकार्यक्रम अधिकारी प्रा. चहारे, सदस्य डॉ. ठाकरे, डॉ. मुरमाडे, डॉ. वाळके, प्रा. खोब्रागडे मॅडम यांनी परिश्रम घेतले.