राज्य अध्यक्ष यु जी बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडे बुद्ध लेणी येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ संपन्न

15

राज्य अध्यक्ष यु जी बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडे बुद्ध लेणी येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ संपन्न

राज्य अध्यक्ष यु जी बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडे बुद्ध लेणी येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ संपन्न

विश्वास गायकवाड
बोरघर / माणगाव
९८२२५८०२३२

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दक्षिण विभाग पुरुष व महिला कार्यकारिणी यांच्या विद्यमाने,भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा व बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा यांच्या सहकार्याने तसेच संस्कार विभाग रायगड दक्षिण यांच्या अधिपत्याखाली वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कुडे बुद्ध लेणी येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु. जी. बोराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव यांनी भूषविले.
या प्रसंगी महाराष्ट्रा राज्य प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष उत्तम मगरे, राज्य कार्यालयीन सचिव बापुसाहेब निकाळजे तसेच अनेक जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात खालू बाजा,लेझीमच्या ठेक्यावर व समता सैनिक दलाच्या ताफ्याने मान्यवरांची कुडे लेणी येथे भव्य मिरवणुकीने झाली.कुडे लेणी येथे समता सैनिक दलाच्या वतीने प्रमुख मान्यवरांना जनरल सलामी देण्यात आली. त्यानंतर तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन करून सामुदायिक वंदना व सूत्रपठण घेण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून तळा तालुका अध्यक्ष रामदास शिंदे तसेच अनंत मोरे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रसंगी रायगड जिल्हा संस्कार उपाध्यक्ष नितीन मोरे, ऍड. बिपीन साळवी, संगीता तांबे, अनंत मोरे, रवींद्र आयनोडकर, सुनील जाधव,अनंत कासारे,प्रबुद्ध जाधव,प्रसाद चाफे, प्रतिभा शिंदे, सरिता तांबे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य संस्कार सचिव बापुसाहेब कांबळे यांनी आपल्या मनोगतात “बौद्ध धम्म केवळ सांगण्यापुरता नसून आचरणातून जोपासला गेला पाहिजे, तरच समाजाची उन्नती होईल,” असे प्रतिपादन केले.राज्य कार्यालयीन सचिव बापूसाहेब निकाळजे यांनी “कुडे लेणीचा हा ऐतिहासिक वारसा जतन करून धम्म जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे,” असे सांगितले. तळा तालुका अध्यक्ष रामदास शिंदे यांनी आपल्या मनोगतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दहा ध्येय-उद्दिष्टांवर भर देत, “नवीन पिढीसाठी धम्म आणि शिक्षण याकरिता लवकरच बुद्धिस्ट सेमिनरीज उभारण्यात येईल,” अशी घोषणा केली.
प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु.जी.बोराडे यांनी तळा तालुका व रायगड दक्षिण विभागाने केलेल्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आभार मानले आणि “दोन्ही संस्था एकत्र राहून काम करत असल्यास आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करू शकतो,” असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगड जिल्हा सरचिटणीस नवनीत साळवी यांनी गतिमान पद्धतीने केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तळा,माणगाव,म्हसळा,महाड,रोहा,श्रीवर्धन,पोलादपूर शाखांचे पदाधिकारी,धम्म उपासक-उपासिका तसेच रायगड जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलाचे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी कुडे येथील रहिवासी व तळा तालुका माजी कार्यालयीन सचिव केशव लोखंडे यांनी आलेल्या लोकांसाठी भोजनदान दिले तसेच तळा, मुंबई व माणगाव येथील दानदात्यांच्या धम्मदानातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय मनोगत रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव यांनी व्यक्त केले, तर आभार प्रदर्शन रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अस्मिता जाधव यांनी केले. सरणत्तय घेऊन वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी तळा तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा व बौध्दजन पंचायत समिती या दोन्ही संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली.