गंजाड ग्रामपंचायतीत “प्लास्टिक बँक व मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी” केंद्राचे उद्घाटन

210

 गंजाड ग्रामपंचायतीत “प्लास्टिक बँक व मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी” केंद्राचे उद्घाटन

गंजाड ग्रामपंचायतीत “प्लास्टिक बँक व मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी” केंद्राचे उद्घाटन

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755

“स्वच्छ गंजाड – सुंदर गंजाड” उपक्रमास सुरूवात

डहाणू :- गंजाड ग्रामपंचायतीत CWAS, CRDF, CEPT University Ahmedabad यांच्या HDFC Bank CSR च्या सहयोगातून “प्लास्टिक संकलन व विलगीकरण केंद्र” (Plastic Bank व Material Recovery Facility – MRF) स्थापन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट “स्वच्छ गंजाड – सुंदर गंजाड” तसेच “प्लास्टिक मुक्त गंजाड” हे साध्य करणे आहे.
या केंद्राचे उद्घाटन मा. मनोज रानडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद) यांच्या शुभहस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री पारसकर (उप मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि मा. पल्लवी सस्ते मॅडम (गट विकास अधिकारी, डहाणू) उपस्थित होते.
ग्रामपंचायत गंजाड अंतर्गत सहा महसूल गावे आणि एक मोठी बाजारपेठ असून दररोज मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण होतो. या समस्येवर उपाय म्हणून हे केंद्र उभारण्यात आले आहे. या माध्यमातून प्लास्टिकचे संकलन, विलगीकरण आणि पुनर्प्रक्रिया केली जाणार असून, पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामस्वच्छतेस हातभार लागणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत गंजाडच्या वतीने लोकनियुक्त सरपंच अभिजीत देसक, उपसरपंच कौशल कामडी, ग्रामपंचायत अधिकारी रुपल संखे, सदस्य विलास वरखंडे, अरविंद लाखन, रुपेश घोरखाणा, तंटामुक्ती अध्यक्ष प्रविण वरठा तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गट यांच्या सहकार्याने करण्यात आले.
या उपक्रमात CWAS, CRDF, CEPT टीम मधील उपासना, चिराग, मनीष, अपूर्व, राजू, शिवानी, विशाल, आरफात आदी मान्यवर उपस्थित होते. या केंद्राच्या माध्यमातून गंजाड ग्रामपंचायत स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे.
“स्वच्छ गंजाड – सुंदर गंजाड” हा उपक्रम ग्रामस्थांच्या सहभागातून यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.