“ऐतिहासिक दिवस, पनवेल,नवी मुंबई आणि मुंबईसाठी विकासाचा नवा अध्याय” —आमदार प्रशांत ठाकूर
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
पनवेल/उलवे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नवी मुंबईतील दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई मेट्रो लाईन ३ च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण पार पडले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवी यांच्यासह राज्यातील अन्य मान्यवर आणि जनतेचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
यावेळी प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले की, “लोकनेते दि. बा. पाटील यांनी समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सेवा, समर्पण आणि संघर्ष यांचे अद्वितीय उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरते.” हा संदेश स्थानिक भूमिपुत्रांचा खरा आवाज ठरला, याकरिता आदरणीय मोदीजींचे मनस्वी आभार व्यक्त करतो ,असं मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलं.
या लोकार्पणामुळे पनवेल,मुंबई महानगर आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी वाहतुकीच्या दृष्टीने एक नवे युग सुरू झाले असून, आधुनिक पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाचे विमानतळ, आणि मेट्रोद्वारे सुगम प्रवास हे “विकसित भारत 2047” च्या दिशेने मोठे पाऊल ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होऊन, अत्यंत अभिमान वाटत आहे , अशी भावना प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.