चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भूमी अभिलेख यांना निवेदन देण्यात आले

17

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भूमी अभिलेख यांना निवेदन देण्यात आले

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भूमी अभिलेख यांना निवेदन देण्यात आले

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953

उमरेड.
उमरेड येथील मुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी कडून होत असलेल्या शासकीय कामात दिरंगाई, टाळाटाळीचे वर्तनाबद्दल, रेकॉर्डसोबत छेडछाड तसेच कर्मचारी व दलाल यांच्याकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तकार.

भुमि अभिलेख कार्यालय उमरेड येथे तालुक्यातील नागरीकांची खालील नमूद केल्याप्रमाणे अनेक प्रकरणे प्रलंबित

उमरेड शहराचे सन 1980-90 च्या दरम्यान सर्व्हे करण्यात आलेला आहे. सदर मोजणी दरम्यान तयार झालेल्या मालकी हक्क व नकाशामध्ये अनेक त्रुटी व तफावती निर्माण झालेल्या आहेत. त्या संबंधानी नागरीकांनी अनेक तकारी व प्रकरणे सदर कार्यालयात दाखल केलेली आहेत. त्यांची योग्यरित्या हाताळणी न होता कार्यालयाकडून निरनिराळी कारणे सांगून तकारीचा निपटारा होण्यास सदर टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत आहे.

उमरेड तालुक्यात शासनाकडून नागरीकांच्या अनेक गावातील शेतजमिनी शासकीय योजनेखाली यापूर्वी संपादित केलेल्या आहे. त्यावर शासनाचा कब्जा व वापर सुद्धा मागील अनेक वर्षापासून सुद्धा सुरू आहे. त्यासंबंधाने संबधीत भूमि अधिग्रहण अधिकारी यांनी पारित केलेले अहवाल व कमीजास्त पत्रक उमरेड भूमि अभिलेख कार्यालयाकडे अधिग्रहीत भूमिचे नोंद घेण्याकरिता व राजस्व खात्यातील गाव नमुना 7/12 व नकाशामध्ये दुरूस्तीची नोंद घेण्याकरिता पाठविण्यात आलेले आहेत. परंतु त्याकडे उपरोक्त कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क केला असता त्यावर कारवाई करण्याचे सोडून उलट व बेजबाबदार उत्तरे देण्यात येतात. अशाप्रकारे अशिक्षित व गरीब शेतक-यांना सतत चकरा मारण्यास भाग पाडून त्रस्त करण्यात येत असून पैशाची मागणी सुद्धा करण्यात येते.. तसेच संबंधीत शेतकऱ्याला दुरूस्त 7/12 व नकाशा मिळत नसल्याने त्याला शेतविकी किंवा गहाण करून कृषी कर्ज मिळण्यास येणाऱ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.3) सन 1980 च्या दरम्यान तालुक्यातील शेतजमिनीची पुनर्मोजणी होवून सुधारीत गावनमूना व नकाशा आपल्या विभागाकडून तयार करण्यात आलेला नाही. त्यावेळी सदर मोजणी अनेक त्रुटी व तफावत निर्माण झाल्याचे आढळून आलेले आहे. तेव्हा संबधीत शेतकऱ्यांनी त्याबाबत अनेक तकारी उमरेड भूमि अभिलेख कार्यालयाकडे सादर केलेल्या आहे व त्यावर चौकशीची व तफावत / त्रुटी दूर करण्याचे सतत मागणी करीत आलेले आहेत. परंतु त्यांना सुद्धा कार्यालयाकडून अनेक कारणे सांगून हेटाळणीचीव तिरस्काराची वागणूक मिळत आलेली आहे.

उमरेड तालुक्यातील शेतकरी / नागरीकांकडून त्यांच्या शेतजमिनी व मकान मालमत्तेची मोजणी करण्याचे अनेक प्रकरणे सदर कार्यालयात अनेक वर्षापासून पडून आहेत. त्या संबंधाने सुद्धा चौकशी करण्यास अर्जदार कार्यालयात गेले असता कधी कर्मचारी तर कधी अधिकारी हजर मिळत नाही. तसेच अनेक कारणे व सबबी सांगून अर्जदारास वारंवार भेटण्यास चकरा मारणे भाग पाडण्यात येत आहे.

अशाप्रकारे उमरेड भूमापन कार्यालयातील प्रशासकीय कामकाजातील दिरंगाई व टाळाटीचा प्रकार लक्षात घेता त्यात सत्वर सुधारणा होणे आवश्यक झालेले आहे. तसेच दलाल व कर्मचारी यांच्याकडून होत असलेल्या भ्रष्टाचाऱ्यांची आपणाकडून योग्य दाखल घेवून कार्यालयाचा अनागोंदी कारभारावर प्रतिबंध होईल व प्रलंबित प्रकरणाचा सत्वर निपटारा होईल अशी विनंती आहे व तशी अपेक्षा सुद्धा करीत आहोत. इत्पर उक्त कार्यालयातील प्रशासकीय कामकाजात समाधानकारक गती दिसून न आल्यास नागरीकांना प्रशासनाविरूद्ध कार्यालयासमोर आंदोलनाचा मार्ग स्विकारणे नाईलाजास्तव भाग पडेल. तेव्हा तशी पाळी येणार नाही अशी अपेक्षा आहे.निवेदन देताना चंद्रशेखर बावनकुळे उपजिल्हाप्रमुख शिंदे शिवसेना रमेश महातळे विधानसभा प्रमुख सुधाकर मुळे ग्रामपंचायत सदस्य पंकज बे विलास गजभियेले, प्रदीप गेडाम अनिकेत भोंगे गौरव भाकरे, मुन्ना छोटे, पंढरी घरात, दिलीप चांदे,, मिलिंद चौधरी,