भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने परवाना विभागाची एक खिडकी योजनेचे आयोजन

23

भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने परवाना विभागाची एक खिडकी योजनेचे आयोजन

भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने परवाना विभागाची एक खिडकी योजनेचे आयोजन

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलमांनुसार महानगरपलिका कार्यक्षेत्रातील विविध व्यावसायीक आस्थापना, कारखाने, गोडाऊन याकरिता महानगरपालिकेकडून ना हरकत दाखला तसेच व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक असल्याने महानगरपालिकेच्या वतीने एक खिडकी योजना सुरु करण्यात येत आहे. याकरिता नोडल अधिकारी म्हणून उपआयुक्त (परवाना) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तरी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध व्यावसायीक आस्थापना, कारखाने, गोडाऊन धारक यांचा सर्वे करुन ना हरकत दाखला न घेतलेल्या, परवाना नसलेल्या तसेच थकबाकीदार यांना नोटीस बजाविणेची कार्यवाही महानगरपालिकेचे परवाना विभाग प्रमुख यांनी नोडल अधिकारी तथा उपआयुक्त (परवाना) यांचे अधिपत्याखाली करावी असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे यापुढील महानगरपालिका कार्यक्षेत्रातील परवाना, पर्यावरण, अग्निशमन व मालमत्ता कर विभाग इ. सर्व प्रकारचे विविध परवानांचे अर्ज एक खिडकी योजनेतून परवाना विभागात स्विकारण्यात येणार असून यापुढे परवाना विभागातील कर्मचारी व्यवसायीक आस्थापनांकडून मालमत्ता कर थकबाकी वसुल करण्याबरोबरच पर्यावरण व अग्निशमन दाखला तसेच व्यवसाय परवाना फी यांचीही वसुलीची एकत्रित कारवाई करतील. एक खिडकी योजनेतून (परवाना विभागाकडून) प्राप्त होणाऱ्या विविध अर्जावर विहित मुदतीत कार्यवाही करुन नियमानुसार परवाना दाखला देणेकरीता परवाना विभागाकडे अर्ज करण्यात यावेत असे आवाहन मा. आयुक्त तथा प्रशासक श्री अनमोल सागर (भा.प्र.से) यांनी केले आहे.