Flood of illegal liquor in Parchuri village, silver of liquor smugglers.
Flood of illegal liquor in Parchuri village, silver of liquor smugglers.

परचुरी गावात अवैध दारुचा महापुर, दारु तस्करांची चांदी.

 Flood of illegal liquor in Parchuri village, silver of liquor smugglers.

Flood of illegal liquor in Parchuri village, silver of liquor smugglers.

रत्नागिरी:- जिल्हातील गुहागर तालूक्यातील परचुरी गावात अवैध दारुचा महापुर, अवैध देशी व गावरान दारुची विक्री मोठ्या जोरात सुरु आहे. काही हजार लोकसंख्या असलेल्या परचुरी या गावामधील रहिवाशी अविनाश महादेव गमरे व त्याचे सहकारी गावात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती व विक्री राजरोसपणे करत आहे, त्याच्या या बेकायदेशीर कृत्याला स्थानिक रहिवाशांचा विरोध असला तरी तो पोलीस पाटील व सरपंचाना जुमानत नाही कारण त्याला राजकारणी लोकांचा पाठिंबा आहे. गावातील अनेक तरुण दारूच्या व्यसनाला बळी पडल्यामुळे अनेक स्त्रीया अकाली विधवेचं जीवन भोगत आहेत अनेक मुलांच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपले आहे.

अवैध दारुवाल्यावर पोलीसांची भीती नाही??
दारु विक्रेत्यांनी आम्हाला कोणाचीही भीती नाही याचे प्रदर्शन करत गावातील सार्वजनिक ठिकाणी सुध्दा अशा रीकाम्या बाटल्या फेकल्या जात असून मोठ्या प्रमाणात गावरान व देशी दारुची विक्रीचे सत्र सुरुच असून यामुळे गावातील शांतता भंग होत आहे. पोलीसांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाईची मागणी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग व गावकऱ्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here