रायगड मधील आठ पंचायत समितीवर महिलाराज
ग्रामीण विकासाची दोरी महिलांच्या हाती येणार
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी आठ पंचायत समितींवर महिलाराज अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाची दोरी महिलांच्या हाती येणार असल्याने काही ठिकाणची पुरुषी राजवट संपुष्टात येणार आहे. . पंचायत समिती सभापतिपदासाठीचे आरक्षण गुरुवारी जिल्हाधिकारी किशन जावळे अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे मयुरा महाडिक या मुलीच्या हस्ते सोडत पद्धतीने काढण्यात आली . आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात होईल.
अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी म्हसळा तालुक्यातील सभापतिपद आरक्षित झाले असून अनुसूचित जमातीसाठी श्रीवर्धन येथे महिला तर तळा येथे सर्वसाधारण आरक्षित झाले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गा महिलेसाठी अलिबाग आणि महाड तर सर्वसाधारण मध्ये कर्जत आणि माणगाव हे आरक्षित झाले आहे. उर्वरित पनवेल , पेण , सुधागड, रोहा ह्याठिकाणी सर्वसाधारण महिला तर खालापूर, उरण मुरुड, पोलादपूर येथे सर्वसाधारण आरक्षण पडले आहे.
पंचायत समिती सभापती आरक्षण हे चिठ्ठी सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले तसेच त्यामध्ये जास्तीत जास्त महिलाराज आल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा अपेक्षा भंग झाला आहे.या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत ही सोडत जाहीर करण्यात आली.
पंचायत समिती सभापती आरक्षण
म्हसळा – अनुसूचित जाती (महिला)
तळा – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
श्रीवर्धन – अनुसूचित जमाती (महिला)
माणगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
अलिबाग – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
कर्जत – नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
महाड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
पनवेल – सर्वसाधारण (महिला)
खालापूर – सर्वसाधारण
उरण – सर्वसाधारण
मुरुड – सर्वसाधारण
सुधागड – सर्वसाधारण (महिला)
पोलादपूर – सर्वसाधारण
पेण – सर्वसाधारण (महिला)
रोहा – सर्वसाधारण ( महिला)