वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे  जमावबंदीचे आदेश.

52

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे  जमावबंदीचे आदेश.

5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येण्याचे आदेश

लग्न व इतर कार्यक्रमासाठी 50 व्यक्तींचे बंधन

औषधी दुकाने व रुग्णालये सोडून इतर दुकाने व बाजारपेठा सायंकाळी 9 पर्यंत सुरू

Collector orders curfew against rising corona infection.
Collector orders curfew against rising corona infection.

दि 17 फेब्रुवारी प्रतीनीधी 
वर्धा:- जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये कोविड 19 या विषाणुमूळे बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने मोठया प्रमाणात वाढ होत असल्यामुळे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून वर्धा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता जमावबंदीचे आदेश देण्यात आले असुन पाच किवा त्यापेक्षा जास्त लोकांनी जमावाने एकत्र येऊ नये, धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामुहिक कार्यक्रम, सभा, बैठका, लग्नसमारंभ इत्यादी करीता केवळ 50 व्यक्तींना उपस्थितीचे बंधन घटक असून अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमाकरिता संबधीत कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. मिरवणुक व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

कोरोना लसीकरणामुळे वर्धा जिल्ह्यात कोरोना विषाणूबाबतीत लोकांमध्ये एकप्रकारची निष्काळजीपणा वाढला आहे. त्याचा परिणाम दिसायला लागला असून जिल्ह्यात मागील आठवड्यात रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज काही प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

वर्धा शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता जमावबंदीचे आदेश पारीत करण्यात येत असुन त्यानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किवा त्यापेक्षा जास्त लोकांनी जमावाने एकत्र येता येणार नाही, सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजीत करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ,महोत्सव, स्नेहसंमेलने, सामुहिक कार्यक्रम, सभा बैठका, लग्नसमारंभ इत्यादी करीता केवळ 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. परंतु अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमाकरिता संबधीत कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच मिरवणुक व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. मंगलकार्यालये, हॉटेल्स, कॉन्फरन्स रुम व तत्सम गर्दी होणारे कार्यक्रम स्थळांच्या ठिकाणी नियमांचा भंग केल्याचे आढळल्यास ही ठिकाणे सील करण्यात येतील. लग्नसमारंभाच्या नियोजीत स्थळाव्यतिरीक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हॉटेल / पानटपरी / चहाची टपरी / चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे, तसेच निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. सदर ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे आणि नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्यास संबंधीत व्यवसायीक / दुकानदार यांचेवर कारवाई करण्यात यावी. वर्धा जिल्हयातील सर्व धार्मीक संस्था / प्रार्थना स्थळे | यांनी त्यांचे संस्थान / मस्जीद / मंदीर | चर्च व
इतर धार्मिक संस्थानामध्ये / कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करणे तसेच परिसराचे व वारंवार स्पर्श होणाऱ्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. सदर नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळुन आल्यास त्यांचे विरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येईल. वर्धा जिल्हयातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत उ.वि.अ. तथा इंन्सिडंट कमांडंट यांनी दक्षता घेवुन व आवश्यक पथकाचे गठण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

तसेच रुग्णालये आणि औषधी दुकाने वगळता इतर दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत आणि व रेस्त्ररांत व हॉटेल्स रात्री 9 वाजेपर्यंत चालु राहतील. वर्धा जिल्हयामधील 15 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या महाविद्यालयांना 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यापुर्वीच सुरु असणाऱ्या इतर शैक्षणीक संस्था, महाविद्यालये पुर्वी प्रमाणेच सुरु राहतील. या कालावधीत ऑनलाईन / दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील व त्याला अधिक वाव देण्यात यावा. खाजगी आस्थापना / दुकाने या ठिकाणी मास्क घालुन / फेस कव्हर असलेल्या व्यक्तीनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलच्या आतमध्ये सुध्दा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. या बाबत दर्शनि भागात बॅनर / फलक लावणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

हॉटेलमध्ये तसेच बाहेरील आवारात पार्किंगसाठी गर्दी होणार नाही या बाबत योग्य व्यवस्थापन करावे. रांगा व्यवस्थापित करण्यासाठी व सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट चिन्हांचा वापर करून दर्शनी भागात फलक लावण्यात यावा.अतिथी ,ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स, मास्क, हातमोजे यांची संबंधीतांनी योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सार्वजनिकस्थळी (रस्ते, बाजार, रुग्णालय,कार्यालय इ.) थुकणे दंड 500 रुपये दंड, सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न लावणे दंड 200 रुपये दंड, दुकानदार / फळभाजीपाला विक्रेते / सर्व जिवनावश्यक वस्तु विक्रेते इ. आणि ग्राहक यांनी सोशल डिस्टंसिंग न राखणे, ग्राहकामध्ये कमीत कमी 3 फुट अंतर न राखणे, विक्रेत्यांने मार्कीग न करणे यासाठी प्रति व्यक्ती 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी यानो दिले आहेत. दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जिल्हयातील महसुल विभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, नगर पालीका विभाग तसेच सहकार विभाग यांना देण्यात आले आहे.