शहरातील ११ प्रमुख चौकांचे पुनर्रचना

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098
नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर शहरातील वाढत्या वाहतुकीला सुसंगत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासह पादचारी सुरक्षेत वाढ करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने शहरातील ११ प्रमुख चौकांचे पुनर्रचना करण्याचे काम हाती घेतले असून, याकामाची मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शनिवारी (ता:११) पाहणी केली.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, कार्यकारी अभियंता श्री रवींद्र बुंधाडे, श्री राजेंद्र राठोड, उपअभियंता श्री. राहुल देशमुख आणि कनिष्ठ अभियंता श्री आनंद लामसोंगे उपस्थित होते.








