पिंपरी-चिंचवड गोरगरीब कष्टकरी विस्थापितांना न्याय देण्यासाठी, वंचित बहुजन आघाडी उभारणार लढा.

47

पिंपरी-चिंचवड गोरगरीब कष्टकरी विस्थापितांना न्याय देण्यासाठी, वंचित बहुजन आघाडी उभारणार लढा.

 Pimpri-Chinchwad fight to build a deprived Bahujan Front to give justice to the poor and hard working displaced.

Pimpri-Chinchwad fight to build a deprived Bahujan Front to give justice to the poor and hard working displaced.

पिंपरी-चिंचवड:- शहरातील वडमुखवाडी येथील वस्ती रेडझोन चे कारण देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने गोरगरीब कष्टकऱ्यांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली पाडली असून त्यांना विस्थापित करण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले असून या विस्थापितांना न्याय देण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे साहेब व राज्याचे नेते सर्वजीत बनसोडे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पुढील आंदोलनात्मक ध्येय धोरण ठरवण्यात आले असून येणाऱ्या काळामध्ये हा लढा मोठा करून येथील विस्थापितांना न्याय देण्यात येईल असे सांगण्यात आले.

Pimpri-Chinchwad fight to build a deprived Bahujan Front to give justice to the poor and hard working displaced.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव राजन नायर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे संतोष जोगदंड युवा आघाडी चे माजी अध्यक्ष गुलाब पानपाटील महिला आघाडी महासचिव गौरीताई शेलार शहर कार्यकारणी सदस्य राजेंद्र साळवे राहुल बनसोडे आकाश डोंगरे खंडे वस्ती अध्यक्ष शिंदे साहेब महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते व वडमुखवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.