मुख्यमंत्र्यांच्या व्ही सी नंतर वर्धा जिल्हाधिकारी यांचे तात्काळ आदेश.

54

मुख्यमंत्र्यांच्या व्ही सी नंतर वर्धा जिल्हाधिकारी यांचे तात्काळ आदेश.

वर्धा जिल्ह्यात कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी

Immediate order of Wardha Collector after CM's VC.
Immediate order of Wardha Collector after CM’s VC.

आशीष अंबादे प्रतिनिधी दिनांक 16 फेब्रुवारी

वर्धा:- राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 21 जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले असून यात विदर्भातील अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येतील वाढ ही चार टक्के पेक्षा जास्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि वारंवार हात धुणे या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यंत्रणांना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासोबतच लोकांमध्ये कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधून रुग्ण संख्येत वाढ होत असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेतला. मागील 9 ते 15 फेब्रुवारीच्या आठवड्यात राज्यातील काही भागात रुग्णसंख्येत वाढ होत असून यात विदर्भातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच पॉझिटिव्हीटी रेट 15. 63 टक्के आढळून आला आहे. यामागच्या कारणांचा शोध घ्यावा आणि त्यासाठी तात्काळ उपाययोजना राबववव्यात असे श्री ठाकरे यांनी सांगितले.
 
याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांची तात्काळ बैठक घेऊन लग्न समारंभ, मेळावे, मोर्चे, सार्वजनिक कार्यक्रम याठिकाणी 50 लोकांपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्याची मंजुरी देऊ नये. रेस्टारन्ट, तसेच गर्दीच्या ठिकाणी संख्येच्या मर्यादेचे घालून दिलेल्या बंधनाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्कचा वापर बंधनकारक करावा तसेच हातांची स्वछता राखली जाईल याची काळजी घ्यावी. शहरात गर्दीच्या ठिकाणी फवारणी आणि हॅन्ड वॉश सेंटर पुन्हा सुरू करण्यात यावेत असे आदेश दिलेत.
 
सर्व खाजगी डॉक्टरांनी ताप, खोकला व कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने कोरोना चाचणी करण्यास सांगणे बंधनकारक करावे, चाचण्यांची संख्या वाढवावी, अति जोखमीचे रुग्ण आणि जेष्ठ नागरिक यांचे सर्वेक्षण सुरू करावे, मोबाईल टेस्टिंग व्हॅन ग्रामीण भागात सुरू करावी जेणेकरून रुग्णांची चाचणी लवकर होऊन त्यांना तातडीने उपचार घेता येतील,असे जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
 
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सावंगी रुग्णालयाचे डॉ उदय मेघे उपस्थित होते.